सैलानी यात्रेसाठी भाविकांसह व्यापारी डेरे दाखल
By Admin | Published: March 10, 2017 01:41 AM2017-03-10T01:41:04+5:302017-03-10T01:41:04+5:30
प्रशासन सज्ज; १२ मार्चपासून होईल यात्रेला प्रारंभ.
विठ्ठल सोनुने
पिंपळगाव सैलानी (बुलडाणा), दि. ९- हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांचा भव्य यात्रा महोत्सव उद्या होळी पंचमी १२ मार्च पासून प्रारंभ होत आहे. देशाच्या कानाकोपर्यातून हिंदु मुस्लीम भाविक भक्त या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेला अवघे तिन दिवस शिल्लक असतांना सैलानी परिसरात यात्रेसाठी भाविकांसह व्यापारी वर्ग दाखल होत आहे. जिल्हा प्रशासनाही यासाठी सज्ज झाले आहे.
जिल्ह्यासह राज्य व देशभरात भाविक यात्रेसाठी दोन ते तिन दिवसापूर्वी दाखल होतात.यामुळे भाविक सैलानी दर्गा परिसरामध्ये राहण्यासाठी झोपड्यांचे बांधत आहे. व्यापरी वर्ग आपले दुकाने थाटत आहे. यात्रेमध्ये सिनेमा थेटर, आकाश पाळणे, किराणा मालाची दुकाने, नारळाची दुकाने, झोपड्या बांधण्याच्या साहित्या दुकाने, शेरणी फुटाणे, खानावळीचे दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे. गावात मोठय़ा प्रमाणात भाविक दखल होत असल्यामुळे त्यांची सोय करण्यासाठी स्थानिक नागरिक व दुकानदाराही कामामध्ये व्यस्त आहे. तर बुलडाणा पंचायत समितीने यात्रेच्या रस्त्यांची व दुकानाच्या ठिकाणांची आखणी केली आहे. सैलानी दर्गा ते जांभळीवाले बाबा हा मुख्य रस्ता प्रशासनाने शंभर फुटाचा ठेवला आहे. जेणेकरुन या रस्त्यावर भाविकांची गर्दी होणार आहे. याची प्रशासनाने दखल घेतली आहे.
भाविकांसाठी गरम पाण्याची सोय
यात्रेसाठी देशभरातून येणार्या भाविकांसाठी प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून सोय करण्यात येते, भाविकांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे, याची व्यवस्था स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
२00 पोलीस कर्मचारी तैनात
सैलानी बाबाच्या यात्रेसाठी सुरुवातीला बुलडाणा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनखाली २00 पोलिस कर्मचार्यांच्या बंदोस्त ठाणेदार जे.एन.सैय्यद यांच्या मार्गदर्शनात ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात्रेसाठी ३0 पोलिस अधिकारी व ५00 महिला व पुरुष कर्मचार्यांची मागणी प्रशासनाने केली आहे.