होय.. आम्ही जलमुक्त होळी साजरी करू!
By admin | Published: March 24, 2016 02:49 AM2016-03-24T02:49:22+5:302016-03-24T02:49:22+5:30
‘लोकमत’च्या आवाहनाला बुलडाणा जिल्ह्यात प्रतिसाद; शासकीय कार्यालयांसह विद्यार्थीही सरसावले.
खामगाव : दुष्काळामुळे पाण्याचा अपव्यय न करता जलमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन 'लोकमत'ने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच विविध शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांनी 'जलमुक्त होळी'ची शपथ घेऊन पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा संकल्प केला.
खामगाव पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्यांनी जलयुक्त रंगपंचमी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योती राठोड, कृषी अधिकारी अशोक गारडे, सहा. प्रशासन अधिकारी व्ही.पी. महालक्ष्मे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सिद्धार्थ वानखडे, कनिष्ठ सहाय्यक महेंद्र धुरंधर, रवी राठोड, डी.पी. खांदे, एस.के. देशमुख, एम.टी. सातव, एस.एस. बोपटे, अे.डी. सोळंके, आर.टी. तायडे, एस.डी. मसने, एस.व्ही. चौधरी, डॉ.आर.डी. अवताळे, पी.ओ. चव्हाण, एम.के.भळकर, ए.डब्ल्यू. मोरे, एम.बी. मोरे, महादेव पांडे आदी उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ सहायक ए.टी. वानखडे यांनी जलयुक्त रंगपंचमीची शपथ दिली. यावर्षीची दुष्काळी परिस्थिती पाहता पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन सहा. गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी केले.