आझाद हिंदच्यावतीने योगशिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:38+5:302021-06-25T04:24:38+5:30
श्री सद्गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी प्रतिष्ठान, आझाद हिंद महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, बहुजन महिला संघटना, श्री माऊली ...
श्री सद्गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी प्रतिष्ठान, आझाद हिंद महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, बहुजन महिला संघटना, श्री माऊली बहुउद्देशीय संस्था, लक्ष्मी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन तास योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये योगासनातील विविध प्रकारांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्याचा सराव देण्यात आला. योग शिबिराचे औपचारिक उद्घाटन आझाद हिंद संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे, प्रदेश महासचिव संजय एंडोले, प्रसिद्धीप्रमुख आदेश कांडेलकर, सुरेखा निकाळजे, संगीता पवार, अलका खांडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रथमत: राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी, योगगुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिरात सहभागी भक्ती पवार, छाया गोरे, श्वेता पंडित, गिरीजा पंडित, सुनंदा मुंगळे, स्नेहल निकम, सीमा ठाकरे, सीमा होळकर या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिरामध्ये आयोजकांसह बुलडाणा शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाइन स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. योग दिनाच्या निमित्ताने आनंदी जीवन जगण्यासाठी सदैव योग करण्याचा कृतिप्रवण संदेश देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने देण्यात आली. पसायदान व राष्ट्रगीताने योग शिबिराचा समारोप करण्यात आला.