प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:17+5:302021-02-14T04:32:17+5:30

आरोग्यासाठी योगाचे लाभदायक महत्त्व पटवून देत रोज सकाळी घरी सराव करण्यासाठी मार्गदर्शन केले. योग व कवायती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यमय ...

Yogasana lessons for students to boost immunity | प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे

Next

आरोग्यासाठी योगाचे लाभदायक महत्त्व पटवून देत रोज सकाळी घरी सराव करण्यासाठी मार्गदर्शन केले. योग व कवायती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. योगामुळे विद्यार्थ्यांमधील भीती नष्ट होऊन आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. विद्यार्थी शाळेत आल्यापासून शाळेचे रूप बदलले आहे. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेली आहे. नवीन वर्षात विद्यार्थ्यांच्या समाधानकारक उपस्थितीने शाळा बहरून आली असून शिक्षक व विद्यार्थ्यांमधे चैतन्यमय शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना आनंद निर्माण होईल, असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक अनिल चव्हाण व शिक्षक बोराखेडी शाळेत राबवित असतात. सर्व शिक्षकसुद्धा विद्यार्थी उपस्थितांचे समाधान करत ज्ञानदानाचे काम जोमाने करत आहेत.

Web Title: Yogasana lessons for students to boost immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.