युवा शेतकऱ्याच्या तोफेचा शेतशिवारात बुलंद आवाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 03:10 PM2020-01-12T15:10:03+5:302020-01-12T15:10:15+5:30
मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील युवा शेतकºयाच्या या तोफच्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवारातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण होण्यास मोठी मदत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. परंतू वन्यप्राण्यांच्या या संकटावर एका प्रयोगशील युवा शेतकºयाने गावठी तोफ बनवून अनोख्या पद्धतीने मात केली आहे. मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील युवा शेतकºयाच्या या तोफच्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवारातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण होण्यास मोठी मदत होत आहे.
पीक चांगले बहारात येताच माकड, हरिण, निलगाय, रोही यासारख्या वन्यप्राण्यांचा धुमाकूळ त्या पिकांमध्ये सुरू होतो. अनेक वेळा पिकांचे रक्षण करण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर सुद्धा वन्य प्राण्यांपासून हल्ले झालेले आहेत. त्यावर जालीम उपाय म्हणून ऊमरा देशमुख येथील युवा शेतकरी प्रशांत साहेबराव कानोडजे यांनी गावठी तोफ तयार केली आहे. या तोफचा स्पोट ऐकून आता वन्य प्राणी शेतशिवारातही फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये स्फोटासाठी कॅल्शीयम कार्बोनेटचा उपयोग करण्यात आला आहे. या स्फोटामुळे वन्य प्राणी व इतर पक्ष्यांपासूनही पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण होत आहे. सध्या शेतात तूर, हरभरा, गहू, रब्बी ज्वारी यासह विविध रब्बी पिके आहेत. या पिकांना वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी प्रशांत कानोडजे यांनी तयार केलेली तोफ अत्यंत फायद्याची ठरत आहे.
तोफ बनविण्यासाठी वापरलेले साहित्य
प्लास्टिकचा अडीच इंच पाईप एक फूट, दोन इंच पाईप दोन फूट, गॅससाठी वापरण्यात येणारे लाईटर, स्फोटक म्हणून कॅल्शीयम कार्बोनेट आदी साहित्य तोफ बनविण्यासाठी वापरण्यात आले आहे.
असा होतो प्रयोग
प्लास्टिक व इतर साहित्याच्या सहाय्याने बनविलेल्या तोफमध्ये एकावेळी तूरीच्या दाण्याऐवढे कॅल्शीयम कार्बोनेट व पाण्याच्या दोन ते तीन थेंब टाकले जातात. त्यानंतर लाईटरचे बटन दाबताच सुतळी बॉम्ब पेक्षाही मोठा आवाज होतो. हा बार फुटताच शिवारात घुमणाºया आवाजाने वन्य प्राणी शेतातून दूर पळतात.