फिलिपाईन्समधून बुलडाणा शहरात आलेला युवक कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:11 AM2020-05-28T11:11:08+5:302020-05-28T12:42:43+5:30
जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थाना लगतच आढळला रुग्ण:
बुलडाणा: फिलिपाईन्समधून आलेला एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्याच्या संपर्कातील नऊ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानाच्या पाठीमागील बाजूस अवघ्या ७० ते ८० मीटरवर या रुग्णाचे निवासस्थान असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, १२ मे रोजी हा युवक परदेशातून आल्यानंतर बुलडाण्यातील एका हॉटेलमध्ये क्वारंटीन होता. त्यानंतर २८ मे रोजी या युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी आता बुलडाण्यात पुन्हा कोरोना संसर्गाने प्रवेश केला आहे. क्वारंटीनचा काळ पूर्ण झाल्यानंतर हा युवक घरी पोहोचला होता. तर त्याने एका सलूनमध्ये दोन दिवसापूर्वी कटींग केली होती. त्यामुळे संबंधित ठिकाणचे दोन जण, युवकाचे पाच मित्र आणि त्याचे आईवडील अशा नऊ जणांना सध्या क्वारंटीन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे सध्याचे एकंदरीत चित्र पाहता १८ दिवसात २७ कोरोना पॉझिटिव्ह आता आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा आता २१ वर पोहोचला आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २८ आहे. दुसरीकडे बुलडाण्याततील हा युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पालिकेच्या अग्नीश्यामक दलाने लगोलग बुलडाणा बाजार समितीसमोरील या रुग्णाच्या निवासस्थानाचा परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. आता या परिसरातील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून दुपारपर्यंत हा संपूर्ण परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या आरोग्य, महसूल, पोलिस आणि जिल्हा परिषदेच्या पथकाकडून या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. विदेशातून आल्यानंतर हा युवक क्वारंटीन होता. त्यामुळे त्याचा फारसा कोणाशी निकटचा संपर्क आला नसल्याचे आरोग्य वि•ाागातील सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या युवकाचे वडील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. परिणामी आता पुढील घडामोडी कोणते वळण घेतात याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांचेही लक्ष लागून आहे.