वारी भैरवगड येथील डोहात तरूण बूडाला;शोध मोहीम सुरू

By विवेक चांदुरकर | Published: November 17, 2023 06:44 PM2023-11-17T18:44:41+5:302023-11-17T18:46:24+5:30

अजूनही शोध मोहीम सुरूच.

youngster drown lake in Wari Bhairavagad | वारी भैरवगड येथील डोहात तरूण बूडाला;शोध मोहीम सुरू

वारी भैरवगड येथील डोहात तरूण बूडाला;शोध मोहीम सुरू

संग्रामपूर : अकोला - बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील वारी भैरवगड येथील वान नदी पात्रातील डोहात एक तरूण बूडाल्याची घटना शूक्रवारी दूपारी घडली.अकोला जिल्ह्यातील सस्ती वाडेगाव येथील २१ वर्षीय आदित्य जयंत मेहरे डोहात बुडाला आहे. सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वान नदीपात्रातील डोहात शोध मोहीम सूरू आहे. 

अकोला, बुलढाणा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे पुरातन हनुमान मंदिर आहे. हनुमानच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येथे भावीकांची गर्दी होत असते. सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य वातावरण तसेच तीन नद्यांचे संगम असल्याने या जागेला अधिकचे महत्त्व प्राप्त झाले. वान नदी व अर नदी पात्रातील डोह हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या डोहांमध्ये बूडून मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत अनेक तरूणांचा या डोहात बूडून मृत्यू झाला आहे. डोहामध्ये कुणीही जावू नये याकरिता या ठिकाणी लोखंडी जाळीही लावण्यात आली आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत वान नदीपात्रात बूडालेल्या तरूणाचा शोध लागला नसल्याची माहिती सोनाळा पोलिसांनी दिली.

Web Title: youngster drown lake in Wari Bhairavagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.