युवकांनी पक्ष्यांकरिता लावले जलपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:35 AM2021-04-01T04:35:10+5:302021-04-01T04:35:10+5:30
धाड : येथील भीमनगरमधील चार पक्षीप्रेमी युवकांनी पक्ष्यांची तृष्णा भागवण्याकरिता जलपात्र तयार करून ते झाडाला टांगले आहेत. एम.के. थोरात, ...
धाड : येथील भीमनगरमधील चार पक्षीप्रेमी युवकांनी पक्ष्यांची तृष्णा भागवण्याकरिता जलपात्र तयार करून ते झाडाला टांगले आहेत. एम.के. थोरात, हर्षल जाधव, आदित्य मोर यांनी धाड बायपासच्या सहारा चौक ते सावळी फाटा या रस्त्याने जलपात्रे लावली आहेत.
एमपीएसीत परीक्षार्थ्यांचा टक्का घसरला
बुलडाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगार्फे होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला अनुपस्थित उमेदवारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील केंद्रांवर झाली.
अवकाळी पावसाच्या भीतीने धास्ती
बिबी : अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाऊस आल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्लास्टीकचा सर्रास वापर
धामणगाव बढे : गावात प्लास्टीकचा सर्रास वापर होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. प्लास्टीकचे विघटन होत नसल्याने सर्वत्र कचरा पसरल्याचे दिसून येते.
आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी
डोणगाव : येथील आठवडी बाजारात सकाळी ९ ते ५ या वेळेत नागरिकांना भाजीपाला आणण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. बाजार बंद करून वॉर्डात हातगाडीवर भाजीपाला उपलब्ध करून बाजार बंद करणे आवश्यक आहे.
सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर शुकशुकाट
बुलडाणा : कोरोना या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. यानुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सायंकाळी ५ वाजेनंतर शुकशुकाट दिसून येत आहे.
नालीतील सांडपाणी पसरले रस्त्यावर
रायपूर : नालीतील सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सांडपाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना श्वास घेणे नकोसे झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
बुलडाणा : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रक्तपेढीत अतिशय कमी पिशव्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पेट्रोलपंपावर सुविधा उपलब्ध करा!
दुसरबीड : पेट्रोलंपपावर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. पेट्रोलपंपावर शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
प्रवासी निवाऱ्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा
दुसरबीड : दुसरबीड परिसरातील अनेक प्रवासी निवाऱ्यांसमोर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. प्रवाशांना याचा फायदा होईल.
बुलडाण्यातील काही भागातील पथदिवे बंद!
बुलडाणा : शहरातील बस स्थानक ते चिंचोले चौक व बस स्थानक ते धाड नाका या भागातील पथदिवे बंद राहत आहेत. यातील काही पथदिवे दुरुस्त करण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
शहरातील नाल्याची स्वच्छता करण्याची गरज
मोताळा : येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता होत नसल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता होत नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रशासनाने डासांचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणी करून नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी विकास मोरे यांनी केली.
ग्रामपंचायतीमध्ये नेट सुविधा देण्याची मागणी
लोणार : ग्रामीण भागातील विविध प्रमाणपत्र ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विविध कमांसाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संजय देशमुख यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.