तरूणांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा - गजानन शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 07:33 PM2017-05-16T19:33:27+5:302017-05-16T19:33:27+5:30

धाड : आजच्या तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.

The youngsters should make Sambhaji Maharaj's ideal - Gajanan Shastri | तरूणांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा - गजानन शास्त्री

तरूणांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा - गजानन शास्त्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात सतत संघर्ष करून धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी बलीदान दिले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे संभाजी राजे घडले. त्यांचे चरित्राचा सखोल अभ्यासासह त्यांचा आदर्श आजच्या तरूणांनी घेण्याचे आवाहन प्रसिध्द व्याख्याते गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६० व्या जयंती पर्वावर धाडमध्ये बोराडे नगरात राजे संभाजी मित्र मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पोलिस ठाणेदार संग्राम पाटील यांची उपस्थिती होती. गजानन दादा शास्त्री यांनी आपल्या कणखर आवाजात सुरूवातीला संभाजी महाराजांचा पोवाडा सादर करून तरूणांना मंत्रमुग्ध केले. आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की, आपल्या बालवयातच स्वराज्याची आणि धर्माची धुरा संभाजी महाराजांनी सांभाळत अनेक शत्रुंशी ते एकाचवेळी सतत लढा दिला. सोबतच धर्म, सामाजिक, सांस्कृतिक, राजकारण, युध्द या चौफेर विषयावर गाढा अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रावर त्यांची पकड होती. विपरीत परिस्थितीत रयतेची त्यांनी काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचा विस्तार करून गोरगरीब जनतेला न्याय दिला. यावेळी ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या मनोगतातून तरूणांनी व्यसनाधिनता सोडून शरीर बळकट बनवून समाजसेवा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाहीर प्रमोद दांडगे व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी गावातील महिला व नागरिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक तरूणांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली. संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष उबाळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सर्जेराव देशमुख तर आभार तायडे गुरूजी यांनी केले.

 

Web Title: The youngsters should make Sambhaji Maharaj's ideal - Gajanan Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.