जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:52 PM2017-08-03T23:52:51+5:302017-08-03T23:58:41+5:30

नांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. एकट्या नांदुरा तालुक्यातून तीन महिन्यात तब्बल २0 लाख रूपये निधी खर्च झाला असून सेवा मात्र कोणत्याच मिळाल्या नसल्याने गावाच्या विकासाचा निधी व्यर्थ खर्च होत असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झाले आहेत.

Your government service center in the district became headache | जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बनले डोकेदुखी

Next
ठळक मुद्देअनेकांना मनस्तापग्रामपंचायतींचा निधी जातोय व्यर्थतीन महिन्यात २0 लाख रूपये निधी खर्च

संदीप गावंडे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये ई पंचायत प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत या केंद्रांचा कोणताही फायदा झाला नाही. या केंद्रांकरीता ग्रामपंचायतींचा निधी मात्र मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. एकट्या नांदुरा तालुक्यातून तीन महिन्यात तब्बल २0 लाख रूपये निधी खर्च झाला असून सेवा मात्र कोणत्याच मिळाल्या नसल्याने गावाच्या विकासाचा निधी व्यर्थ खर्च होत असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झाले आहेत.
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये यापुर्वी २0११-१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी तसेच कामात पारदर्शकता येण्यासाठी शासनाचा ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय व सीएससी, एसपीव्ही, ई-गव्हर्नस सव्र्हीस इंडिया लि. (केंद्र शासन प्रेरीत उपक्रम) यांच्या संयुक्त माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रामार्फत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे विविध दाखले ऑनलाईन मिळणे तसेच ग्रामपंचायतचे रेकॉर्ड संगणकीकृत करणे तसेच जनतेच्या विविध ऑनलाईन सेवा जसे रेल्वे, बस, आरक्षण, डिटीएच रिचार्ज, बँकींग सेवा, आधारकार्ड, विमा हप्ते भरणे, इलेक्ट्रीक बील भरणे, ई-सुविधा पुरविण्यात येण्याचा मुळ उद्देश आहे. 
सदर आपले सरकार सेवा देण्यासाठी शासन निर्णयानुसार जवळपास १२ हजार रूपये प्रत्येक ग्रामपंचायतीला द्यावे लागतात. तसेच प्रती महिना २७00 रूपये देखभाल दुरूस्ती खर्चही द्यावा लागतो. सदर पैशामधून सर्व प्रकारच्या सेवा पुरविणे, केंद्र चालकांना मानधन देणे, प्रिंटर, कॉम्प्युटर दुरूस्ती, पिंट्ररची शाई व कागद पुरविणे इत्यादी कामे करण्याचे प्रस्तावित असताना प्रत्यक्षात आतापर्यंत कोणत्याच ग्रामपंचायतींचे कॉम्प्युटर व प्रिंटर दुरूस्ती झालेली नसून कागद व शाई सुध्दा पुरविण्यात आलेली नाही. मात्र प्रत्येक ग्रामपंचायतींचे दरमहा १२ हजार असे तिमाहीस ३६ हजार रूपये खर्च सुरू आहे. त्यामुळे विनाकारण होत असलेल्या या खर्चामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य त्रस्त झाले असून गावाच्या विकास कामांसाठी मिळालेला निधी अशाप्रकारे नियोजनशुन्य कारभारामुळे व्यर्थ जात असल्याने सदर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ विषयी सर्वत्र नाराजी पसरली आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे जरुरी आहे. परंतु इंटरनेट नसल्याने सदर केंद्राचा कोणताही फायदा होत नसल्याचे केंद्रचालक सांगतात. बरेचसे केंद्र चालक खाजगी इंटरनेट कॅफेवरून ग्रामपंचायतींची कामे करीत आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत तसेच ऑपरेटींग सिस्टीम अपडेट नाही. कॉम्प्युटर व प्रिंटर नादुरूस्त आहेत. त्यामुळे कामे करण्यास अडचणी येतात. आवश्यक सुविधा पुरविल्यास कामाचा वेग वाढेल.
-निलेश खुपसे,
जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना.

Web Title: Your government service center in the district became headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.