बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 23, 2023 19:11 IST2023-03-23T19:10:57+5:302023-03-23T19:11:13+5:30
एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली.

बुलढाणा : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
बुलढाणा : एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
विवेक गजानन सुसर(२२,दहिद बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बुलढाणा शहरातून मलकापूरकडे जाणाऱ्या रोडवरील राजुर घाटात दहिद बु. येथील विवेक गजानन सुसर यांने गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना शहर पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृतदेहाची तपासणी केली असता त्या युवकाच्या खिशात बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकिट मिळून आल्याने त्याची ओळख पटली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.