मेंढ्या घरी परतल्या मात्र तो आलाच नाही; गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या!
By विवेक चांदुरकर | Published: July 22, 2024 03:24 PM2024-07-22T15:24:54+5:302024-07-22T15:25:09+5:30
दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या मेंढ्या परत आल्या. परंतु तो परत आला नाही.
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क |
खामगाव : शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे (वय २३) या तरूणाने २२ जुलै रोजी मेंढ्या चारत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिस स्टेशन हिवरखेड अंतर्गत येत असलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे मेंढीपालनाकरीता मालगीरी टेकड्याजवळ त्याचा मावसभावासह राहत होता. २१ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या मेंढ्या चारण्यासाठी मालगीरी बाबा मंदिराचे मागे अकोली शिवारात नेल्या होत्या. दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या मेंढ्या परत आल्या. परंतु तो परत आला नाही. त्याचा मावसभाऊ नंदु मासाळ व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता त्याने मालगीरी टेकड्यावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याचे काका कैलास हुरमा ठोंबरे यांनी पोलिस स्टेशन हिवरखेड येथे तक्रार दिली.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व नाईक पोलिस काॅन्सटेबल प्रविण जाधव करीत आहेत.