भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नांनी गाजला युवा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:08 PM2020-02-18T15:08:23+5:302020-02-18T15:08:51+5:30
आमदार रोहित पवार यांनी हा कार्यक्रम एक प्रकारे तरूण तरुणींसाठी एक पर्वणीच ठरावा अशा उंचीवर नेऊन ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कर्जमाफीपेक्षा शेतमालाला भाव का नाही, औद्योगीक धोरणाशी सुसंगत वर्तमान शैक्षणिक धोरण राबविल्या का जात नाही, यासह भविष्याचा वेध घेत राजकीय कोपरखळ्या करणाºया युवक-युवतींच्या प्रश्नांनी बुलडाण्यात सोमवारी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात वेगळेच रंग भरल्या गेले. सोबतच युवकांच्या मनातील या प्रश्नांना तितक्याच खुमासदार व अभ्यासपूर्ण उत्तरांनी आमदार रोहित पवार यांनी हा कार्यक्रम एक प्रकारे तरूण तरुणींसाठी एक पर्वणीच ठरावा अशा उंचीवर नेऊन ठेवला.
राजश्री शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या पुढाकारातून स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर तरुणाईच्या मनातील भावना व आशा, आकांक्षांना वाट मिळून त्यांना वर्तमानातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील करीअरच्या संधी व कल याची माहिती मिळावी यादृष्टीकोणातून हा युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी संदिप शेळके, भाऊसाहेब शेळके, आशिष रहाटे, मुख्यातरसिंग राजपूत, जयश्री शेळके, रविकांत वरपे, पंकज बोराडे, ज्ञानेश्वर सुसर, शेखर बोंद्रे, सुनिल सपकाळ आदी उपस्थित होते. युवकांशी संवाद साधताना त्यांनी भविष्याचा वेध घेणाºया प्रश्नांचा उलगडा केला. बुलडाण्याला जिजाऊ नगरीचे नाव द्या? या प्रश्नाने सुरूवात झालेल्या युवा संवादात युवक व युवतींनी शिक्षण, शेती यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जिजाऊ नगरीचे नाव देण्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी सकारात्मक उत्तर देत युवकांनी ठरवले तर खूप काही बदल होऊन शकतात, त्यासाठी युवकांचे एकत्रिकरण महत्त्वाचे आहे. युवकांच्या एकत्रिकरणातून नवा विचार, नवे राज्य निर्माण होऊ शकते. प्रमुख्याने शिक्षणात आवश्यक असणारे बदलही त्यांनी स्पष्ट केले. इंटरनेटचा वापर शिक्षणासाठी केला, तर विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठी मदत होईल. एमपीएससी, यूपीएससीसाठी प्रशिक्षाणाठी दिल्लीसारख्या ठिकाणे युवक जातात. त्यामुळे हेच प्रशिक्षण महाराष्ट्रात मिळाले तर मोठा फायदा होऊ शकतो. शासकीय मेडीकल व इंजिनिअर कॉलेजच्या प्रश्नावर त्यांनी बुलडाण्यात येत्या दोन ते तीन वर्षात ह्या सुविधा देण्यात येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.