विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:24 IST2020-04-22T18:24:47+5:302020-04-22T18:24:52+5:30
मनोज पूंडलिक बेंदरकार (वय २६) हा तरूण ईलेक्ट्रिक वॉटर फिल्टरचे काम करीत असतांना त्याला विजेचा जबरदस्त शॉक लागला.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू!
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : संग्रामपुर तालुक्यातील टुनकी खुर्द येथील एका २६ वर्षीय तरूणाचा विजेच्या धक्क्याने मूत्यू झाला. ही घटना २१ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनला रात्री दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. येथील मनोज पूंडलिक बेंदरकार (वय २६) हा तरूण ईलेक्ट्रिक वॉटर फिल्टरचे काम करीत असतांना त्याला विजेचा जबरदस्त शॉक लागला. त्यात तो अत्यवस्थ झाला होता. नातेवाईकांनी उपचारासाठी त्यास वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांकडून या यूवकाला मुत घोषित करण्यात आले. २२ एप्रिलरोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून नियमाचे पालन करीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोजच्या पश्चात आई, दोन बहीनी असा आप्त परीवार आहे. हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)