पुणे जिल्ह्यातील अपघातात मलकापूरचा युवक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:05 PM2020-06-15T12:05:09+5:302020-06-15T12:06:56+5:30

पुणे जिल्ह्यातील शिरूर नजिक मोटारसायकल अपघातात मलकापूरचा एक युवक ठार,तर एक गंभीर जखमी झाला.

A youth from Malkapur was killed in an accident near Shirur | पुणे जिल्ह्यातील अपघातात मलकापूरचा युवक ठार, एक गंभीर

पुणे जिल्ह्यातील अपघातात मलकापूरचा युवक ठार, एक गंभीर

Next

मलकापूरःपुणे जिल्ह्यातील शिरूर नजिक मोटारसायकल अपघातातमलकापूरचा एक युवक ठार,तर एक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री हा अपघात घडला. संबधीतांच्या नातेवाईकांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,मलकापूरातील दोन युवक कार्तिक बंडू आगलावे वय २३ रा.लक्ष्मी नगर व गणेश विनायक भगत रा.सावजी जिनिंग मलकापूर दोघे नोकरीच्या शोधात मोटारसायकलने बाहेर पडले होते.
पुणे जिल्ह्यातील शिरूर नजिक त्यांच्या मोटारसायकलीला अद्यात वाहनाने धडक दिली. त्यात कार्तिक आगलावे हा युवक जागीच ठार झाला. तर गणेश भगत हा पायावर गंभीर जखमा झाल्याने त्याला खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
या माहीतीस आगलावे व भगत परिवारातील सदस्यांनी दुजोरा दिला आहे 

Web Title: A youth from Malkapur was killed in an accident near Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.