विवाहितेवर युवकाचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:59 PM2020-01-10T14:59:56+5:302020-01-10T15:00:03+5:30
पती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर विशाल ज्ञानेश्वर फोलाने (वय २३) हा युवक त्या महिलेला वारंवार त्रास देत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील एका विवाहित महिलेवर युवकाने वारंवार अत्याचार केल्याची घटना ८ जानेवारी रोजी उघडकीस आली. आरोपीने अश्लील व्हिडीओ असल्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेलिंगही केले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशरला गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
बुलडाणा शहरातील भाड्याच्या खोलीत पती-पत्नी राहत होते. दरम्यान, पती कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर विशाल ज्ञानेश्वर फोलाने (वय २३) हा युवक त्या महिलेला वारंवार त्रास देत होता. दरम्यान, त्या युवकाने महिलेवर वारंवार बलात्कारही केला. त्याच्याकडून अत्याचार सुरुच असल्याने महिलेने पतीला ही घटना सांगितली. अखेर हे कुटुंब काही दिवसांपूर्वी खोली बदलून दुसऱ्या शहरात राहायला गेले. मात्र, विशाल फोलाने याने तु भेटीला ये, असा तगादा लावला. तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकीही महिलेला दिली. या प्रकरणी शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपी विशाल फोलाने यास अटक केली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.