इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:51+5:30

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वारंवार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहेत. केंद्र सरकारच्या घोषणा फोल ठरत आहेत. त्यामुळे युवासेनेच्यावतीने नागरिकांना लॉलीपापचे वितरण करून बैलबंडीसह सायकल रॅली काढण्यात आली.

Youth Sena agitation against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे आंदोलन

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात युवासेनेच्यावतीने युवासेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात बैलबंडीसह सायकल रॅली काढून तसेच नागरिकांना लॉलीपॉप वितरित करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वारंवार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहेत. केंद्र सरकारच्या घोषणा फोल ठरत आहेत. त्यामुळे युवासेनेच्यावतीने नागरिकांना लॉलीपापचे वितरण करून बैलबंडीसह सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे स्वप्निल काशीकर, वसीम भाई, सूरज घोंगे, युवासेनेचे जिल्हा चिटणीस विनय धोबे,  समन्वयक विक्रांत सहारे, उपजिल्हाधिकारी सुमित अग्रवाल, शहर अधिकारी, अक्षय अंबिरवार, प्रमोद नन्नावरे, शहर समन्वयक करण वैरागडे, शहर चिटणीस नगाजी गनफाडे, तेलतुमडे, युवती सेना उपजिल्हाधिकारी  रोहिणी पाटील, विपश्यना मेश्राम, तालुका अधिकारी प्रगती पडगेलवार,  युवासेनेचे सुचित पिंपळशेंडे, उपशहर अधिकारी समीर मेश्राम, वैभव  काळे, प्रफुल्ल चावरे, तालुका सन्मवयक नागेश कडुकर, अमोल मंगाम, हसंराज खरोले, प्रवीण ऊके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

दरवाढीविरोधात तहसीलवर धडक
सिंदेवाही : केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ रविवारी  युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय सिंदेवाही  या महामार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष चिंतलवार, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र मंडलवार, शिवसेना शहरप्रमुख विकास आदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख स्वप्नील चहांदे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज ननेवार, युवासेना चिटणीस सागर बोरकर, युवासेना शहरप्रमुख प्रीतम नागोसे, वाहतूक सेना अमन पटेल, ऑटो संघटना सुमित कटकमवार, प्रतिश वैकुंठी, अमोल कोंडापुरवार, आदी उपस्थित होते.

 

Web Title: Youth Sena agitation against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.