युवकांनी देश व समाजाच्या विकासासाठी कार्य करावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 07:07 PM2017-11-19T19:07:12+5:302017-11-19T19:09:06+5:30

बुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.

The youth should work for the development of the country and society | युवकांनी देश व समाजाच्या विकासासाठी कार्य करावे 

युवकांनी देश व समाजाच्या विकासासाठी कार्य करावे 

Next
ठळक मुद्दे उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले आवाहनराष्ट्रीय युवा नेता व युवा सांसद कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी  केले.
 स्थानिक जिजामाता महाविदद्यालयात  १८ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय युवा नेता व युवा सांसद  कार्यक्रमात ते बोलत होते. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा विभागाअंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  डॉ. विकास बाहेकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दामोधर अंभोरे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुनिल देशमुख, प्रा.डॉ.ए.जे.हेलगे, प्रा.डॉ.अनंत सिरसाट, प्रा.सुरेंद्र शेजे, प्रा.सुनिल मामलकर, प्रा.सुबोध चिंचोले  आदी उपस्थित होते.  डॉ.विकास बाहेकर यांनी  सांगितले की, आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे युवकांना रोज विविध स्पर्धांना सामोरे जावे लागत आहे. अपयशाने खचून न जाता त्याचा सामना करावा. शुध्द आचरणाने चारित्र जपावे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दामोधर अंभोरे यांनी की,  युवकांनी दैनंदिन कामाचे नियोजन करावे, स्वयंशिस्तीचे पालन करावे, चांगले चारित्र घडवावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची भुमिका विश्द केली. आभार राष्ट्रीय सेवा योजनाचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. हेलगे यांनी तर आभार कोमल सुरोशे यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय चाफेकर,  राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अविनाश मोरे, दिलीप महाले. भागवत निकम यांनी प्रयत्न केले.

Web Title: The youth should work for the development of the country and society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.