कुक्कुटपालनातून सिंदखेडच्या युवकांनी साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:11+5:302021-05-23T04:34:11+5:30

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये सिंदखेड लपाली गावाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळविला होता. ...

The youth of Sindkhed made progress through poultry farming | कुक्कुटपालनातून सिंदखेडच्या युवकांनी साधली प्रगती

कुक्कुटपालनातून सिंदखेडच्या युवकांनी साधली प्रगती

googlenewsNext

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये सिंदखेड लपाली गावाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळविला होता. समृद्ध गाव स्पर्धेत सुद्धा हे गाव विविध निकषावर चांगले काम करीत आहे. स्पर्धेमधील जलव्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, वृक्ष संगोपन, गवताचे संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे व मातीचे आरोग्य सुधारणे या सहा स्तंभावर गावाची नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे.

यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिर्हे यांच्यासह सिंदखेडच्या सरपंच सीमा कदम व ग्रामपंचायत पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेतील गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या घटकावर गावातील जलमित्र व शेतकरी परिश्रम करीत आहेत. गावातील तीन जलमित्र राजू तायडे, ज्ञानेश्वर बावणे व रवींद्र कोठाळे या तिघांनी गावात गावरान कोंबडी पालन व दुग्धव्यवसायाला सुरुवात केली आहे.

एका महिन्यात दुप्पट नफा

एका महिन्यापूर्वी गावरान कोंबड्यांची ७०० पिल्ले आणून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आहे. एकाच महिन्यात या पिल्लांचे वजन जवळपास सरासरी १ किलोपर्यंत झाले आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी पिल्ले खरेदी करणे, पक्षी खाद्य, लसीकरण व शेड दुरुस्ती याकरिता आतापर्यंत ७० हजार रुपये खर्च झालेला आहे. आजच्या एका महिन्याच्या पिल्लाची किंमत २०० रु. जरी पकडली तरी जवळपास १ लाख ४० हजार रुपये उत्पन्न त्यांना मिळू शकते. म्हणजेच एका महिन्यात दुप्पट झालेली आहे. कोंबडी पालन व्यवसायात या टीमने दूरदृष्टीने नियोजन करीत पक्षी विक्री न करता पुढील काळात गावरान अंडी विक्री व्यवसाय सुरू करणार आहेत. या महिन्याच्या शेवटी ५०० कोंबड्यांचे नवीन युनिट तयार करणार आहेत. या टीमने उचललेलं हे पाऊल इतर गावातील गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Web Title: The youth of Sindkhed made progress through poultry farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.