गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:52 AM2017-09-08T00:52:01+5:302017-09-08T00:52:32+5:30
मांडवा शिवारात एका २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बिबी : मांडवा शिवारात एका २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
यवतमाळ जिल्ह्यातील जनुना ता.उमरखेड येथील विजय रामचंद्र राठोड या युवकाने मांडवा शिवारातील भगवान दराडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सदर घटना शे तमालक शेतात गेल्यावर त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मांडवा येथील पोलीस पाटील तेजराव लोढे यांना माहिती दिली.
त्यांच्या तक्रारीवरून बिबी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माळी, सहायक उपनिरीक्षक विजय पवार यांनी घटनास् थळाचा पंचनामा केला. विजय राठोड यांच्या खिशातील आधारकार्ड व पॅनकार्डवरून ओळख पटली.
याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. बिबी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
थ्रेशरमध्ये शर्ट आल्याने इसमाचा मृत्यू
मेहकर : थ्रेशरमध्ये शर्ट अडकल्याने एका ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली. मेहकर तालुक्यातील गणपूर येथील अनिल रामदास चव्हाण हे गणपूर शिवारात शेतात थ्रेशरमधून उडीद काढत होते. दरम्यान, अनिल चव्हाण यांचा शर्ट थ्रेशरमध्ये अडकल्याने ते थ्रेशरमधून शर्ट काढत अस ताना तोल जाऊन ते पूर्णपणे थ्रेशरमध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला.