युवकाची दुकानावर दगडफेक, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:45+5:302021-08-01T04:31:45+5:30
माेबाईल शाॅपी फाेडणाऱ्या आराेपीस अटक चिखली : तालुक्यातील मेरा खुर्द येथील फाट्यावरील मोबाईल शॉपी व पानटपरी फोडून माल चोरुन ...
माेबाईल शाॅपी फाेडणाऱ्या आराेपीस अटक
चिखली : तालुक्यातील मेरा खुर्द येथील फाट्यावरील मोबाईल शॉपी व पानटपरी फोडून माल चोरुन नेणाऱ्या भरोसा येथील आरोपीस अंढेरा पोलिसांनी अटक केली आहे. सोपान तुकाराम बुरुकुल असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील मेरा फाट्यावर शेख हारुण शेख ताहेर यांच्या मालकीचे दुकान चाेरट्यांनी फाेडले हाेते़
जानेफळात तंटामुक्त अध्यक्षपदासाठी चुरस वाढली
जानेफळ : येथील अनेकांना महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचे वेध लागले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देऊन येत्या १५ ऑगस्ट पर्यंत नवीन अध्यक्षाची निवड करावी अशा प्रकारची लेखी मागणी केली आहे.
भावी शिक्षकांना मिळाला दिलासा
बुलडाणा : शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्याने भावी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे़ ही परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर १० ऑक्टाेबर राेजी हाेणार आहे़ दाेन वर्षांपासून टीईटी परीक्षेचे आयाेजन करण्यात आलेले नाही़
जाेहर नगरातील रस्त्याची दुरुस्ती करा
बुलडाणा : शहरातील जोहर नगर मधील सोफा मशीद समोरील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याबाबत अनेकवेळा प्रशासनाला निवेदन देऊनही या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
बुलडाणा : वन्य प्राणी शेतकऱ्यांचा शेतमाल खाऊन त्यांचे खूप मोठे नुकसान करतात अशावेळी वनविभाग नुकसान भरपाई देते. मात्र ती मदतही तोडकी असते अशा वेळी नुकसानच होणार नाही अशा उपाययोजना करा, अशी मागणी शेतकरी नेते संतोष परिहार यांनी केली आहे़