सायकलद्वारे वाशिम ते लालबाग प्रवास करून रक्तदान, प्रदुषणमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:00 PM2018-09-16T15:00:35+5:302018-09-16T15:02:23+5:30

डोणगाव (जि. बुलडाणा): ग्लोबल वार्मिंगची समस्या पाहता प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हा संदेश घेऊन वाशिम ते लालबाग (मुंबई) असा ६०० किमीचा प्रवास वाशिमच्या तीन युवकांनी १६ सप्टेंबरपासून सुरू केला आहे.

youth traveled through Washim to Lalbag by bicycle | सायकलद्वारे वाशिम ते लालबाग प्रवास करून रक्तदान, प्रदुषणमुक्तीचा संदेश

सायकलद्वारे वाशिम ते लालबाग प्रवास करून रक्तदान, प्रदुषणमुक्तीचा संदेश

Next
ठळक मुद्देसंदेश या सायकल फेरीद्वारे देण्याचा वाशिमच्या नारायण व्यास, अक्षय हजारे, महेश धोंगडे या युवकांचा प्रयत्न आहे. प्रतीदिन २०० किमीचा प्रवास हे युवक करणार असून औरंगाबाद आणि राळेगण सिंद्धी अशा दोन ठिकाणी ये युवक मुक्काम करणार आहेत. १६ सप्टेंबरला सकाळी सव्वा सहा वाजता वाशिम येथून या युवकांनी लालबागसाठी (मुंबई) प्रयाण केले.

- सचीन गाभणे

डोणगाव (जि. बुलडाणा): ग्लोबल वार्मिंगची समस्या पाहता प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हा संदेश घेऊन वाशिम ते लालबाग (मुंबई) असा ६०० किमीचा प्रवास वाशिमच्या तीन युवकांनी १६ सप्टेंबरपासून सुरू केला आहे. सलग तीन वर्षापासून सायकलद्वारे लालबाग येथे जाऊन हा संदेश हे युवक पोहोचवत आहे. अधुनिकीकरण झाले असले तरी त्यातून निर्माण झालेल्या समस्या पाहता शाश्वत विकासाची मुल्ये जपण्याची गरज असून त्यासाठीच प्रदुषणमुक्ती काळाची गरज बनली आहे, असा संदेश या सायकल फेरीद्वारे देण्याचा वाशिमच्या नारायण व्यास, अक्षय हजारे, महेश धोंगडे या युवकांचा प्रयत्न आहे. मोरया ब्लड ग्रुपच्या सहकार्याने ही फेरी या युवकांनी आयोजित केली आहे. यामध्ये प्रतीदिन २०० किमीचा प्रवास हे युवक करणार असून औरंगाबाद आणि राळेगण सिंद्धी अशा दोन ठिकाणी ये युवक मुक्काम करणार आहेत. रविवार १६ सप्टेंबरला सकाळी सव्वा सहा वाजता वाशिम येथून या युवकांनी लालबागसाठी (मुंबई) प्रयाण केले. दरम्यान, सकाळी दहा वाजता ते डोणगाव येथे आले असता पंचायत समिती सदस्य निंबाजी पांडव, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अप्पा फिसके, शहरप्रमुख प्रकाश मानवतकर, संतोष पळसकर, सचिन गाभणे, जमीर शहा, गजानन सातपुते, माधव पांडव, शौतकभाई यांनी त्यांचे शाळ, श्रीफळ देऊन स्वागत केले तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अण्णा हजारेंचीही घेणार भेट लालबाग पर्यंतच्या आपल्या प्रवासादरम्यान हे युवक दुसरा मुक्का समाजसेवक अण्णा हजारे यांच राळेगण सिंद्धी येथे करणार आहेत. त्या दरम्या, अण्णा हजारे यांचीही ते भेट घेणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबरला लालबाग येते पाहोचून ते त्यांच्या या जागृती अभियानाचा समारोप करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या या उपक्रमाचे गावोगावी स्वागत होत आहे.

Web Title: youth traveled through Washim to Lalbag by bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.