जिल्हा परिषद सभापती पद : तीन भाजप, एक राष्ट्रवादीच्या वाट्याला

By admin | Published: April 5, 2017 07:28 PM2017-04-05T19:28:36+5:302017-04-05T19:28:36+5:30

बुलडाणा जि.प. सभापती पदाची निवडणूक ५ एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला एक सभापती पद आले आहे.

Zilla Parishad Chairman's post: Three BJP, one NCP | जिल्हा परिषद सभापती पद : तीन भाजप, एक राष्ट्रवादीच्या वाट्याला

जिल्हा परिषद सभापती पद : तीन भाजप, एक राष्ट्रवादीच्या वाट्याला

Next

बुलडाणा: मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक ५ एप्रिल रोजी येथील शिवाजी सभागृहात पार पडली. यामध्ये सत्तेच्या वाटाघाटी फॉर्म्युल्यानुसार भाजपाच्या वाट्याला तिन व राष्ट्रवादीच्या वाट्याला एक सभापती पद आले आहे.
त्यामध्ये अर्थ, बांधकाम, महिला-बालकल्याण व समाज कल्याण विभागाचे सभापतीपद भाजपाच्या वाट्याला, तर आरोग्य व पशुसंवर्धन सभापतीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. दोन सभापती घाटावरील, तर दोन सभापती घाटाखालील आहेत. दिनकर बापू देशमुख यांना कृषी व पशुसंवर्धन, श्वेताताई महाले यांना महिला-बालकल्याण, तर राजेंद्र उमाळे यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद मिळाले आहे.

Web Title: Zilla Parishad Chairman's post: Three BJP, one NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.