जिल्हा परिषदेच्या शाळा ‘क्वारंटीन मुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:21 PM2020-08-21T12:21:29+5:302020-08-21T12:21:44+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांचा क्वारंटीन सेंटर म्हणून उपयोग केला जाणार नसून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Zilla Parishad schools 'quarantine free' | जिल्हा परिषदेच्या शाळा ‘क्वारंटीन मुक्त’

जिल्हा परिषदेच्या शाळा ‘क्वारंटीन मुक्त’

Next

- विवेक चांदुरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनामुळे संशयीत किंवा बाहेर राज्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटीन करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता शाळा क्वारंटीनमुक्त करण्यात आल्या असून, यामध्ये कुणालाही क्वारंटीन करण्यात येणार नाही.
मार्च महिन्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार राज्यात व्हायला लागला. त्यामुळे बाहेर राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना १४ दिवस कुणाच्याही संपर्कात न येऊ देता क्वारंटीन करण्यात येत होते. या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना क्वारंटीन करण्याकरिता जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळा उपयोगात आणण्यात येत होत्या. गावांमध्ये असलेल्या अनेक शाळांमध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना क्वारंटीन करण्यात आले होते. प्रशासनाच्यावतीने त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. खामगाव तालुक्यात १८ शाळांमध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना ठेवण्यात आले होते.
पाच महिन्यानंतर आता लॉकडाऊन उघडल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना क्वारंटीन करण्यात येत नाही. तसेच १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांचा क्वारंटीन सेंटर म्हणून उपयोग केला जाणार नसून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

शाळांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण सुरू
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाहेर राज्यातून तसेच जिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटीन करण्यात आले होते. यापैकी काही नागरिक तपासणीनंतर कोरोना पॉझिटीव्हही आढळले होते. त्यामुळे या शाळांची आता स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शासनाचे आदेश आल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील १८ शाळांमध्ये नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले होते. आता यापुढे शाळांमध्ये क्वारंटीन करण्यात येणार नाही.
- गजानन गायकवाड
शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

Web Title: Zilla Parishad schools 'quarantine free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.