बारमध्ये रात्री उशिरापर्यंत झिंगाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:14+5:302021-01-23T04:35:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे राज्यात लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यानुसार बार ...

Zingat in the bar till late at night! | बारमध्ये रात्री उशिरापर्यंत झिंगाट!

बारमध्ये रात्री उशिरापर्यंत झिंगाट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे राज्यात लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यानुसार बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास शासनाने वेळेची मर्यादा ठेवून परवानगी दिली आहे. रात्री १० वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्यास परवानगी असताना बुलडाणा शहरातील अनेक बार रात्री उशिरापयर्यंत सुरूच असल्याचे लाेकमतने २१ जानेवारी राेजी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले.

जिल्हा प्रशासनाने ३१ जानेवारीपर्यंत लाॅकडाऊन कायम ठेवले आहे. तसेच वेळाेवेळी दिलेल्या आदेशानुसार यामध्ये शिथीलता आणि निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील बार आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, शहरातील खामगाव राेड, चिखली राेड, जांभरून राेड आणि मलकापूर राेडवर असलेले अनेक बार रात्री १० नंतरही सुरू असल्याचे लाेकमतने २१ जानेवारी राेजी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले. विशेष म्हणजे काही बारच्या समाेरचा दरवाजा बंद आढळला. मात्र, मागच्या दरवाजातून मद्यविक्री सुरू असल्याचे चित्र आहे. कारवाई हाेत नसल्याने बार मालकांची हिंमत वाढली आहे. १० नंतर बार सुरू करण्यास परवानगी नसली तरी रात्री उशिरापयर्यंत झिंगाट सुरू असल्याचे चित्र आहे.

बाहेरुन बंद, आतून सुरू

चिखली राेड आणि खामगाव रस्त्यावर फेरफटका मारला असता अनेक बार रात्री १० नंतर सुरू असल्याचे आढळले. काही बारचे समाेरचे गेट बंद असल्याचे आढळले. तसेच मागच्या दरवाजातून दारु विक्री सुरू असल्याचे यावेळी आढळले. रात्री उशिरापयर्यंत सुरू असलेल्या बारवर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे. जांभरुन राेड व मलकापूर रस्त्यावरही अनेक बार सुरू असल्याचे आढळले. रात्री १० वाजेपर्यंत असलेल्या वेळ मर्यादेचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचे यावेळी आढळून आले. कारवाई हाेत नसल्याने नियमांचे उल्लंघन हाेत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय आहे

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात परवानाधारक दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच काेराेनाविषयक नियमांचे पालन करून बार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Zingat in the bar till late at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.