जि.प. पदाधिका-यांचे राजीनामे घेणारच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2016 01:41 AM2016-02-04T01:41:58+5:302016-02-04T01:41:58+5:30
राजकीय तडजोडीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांना दिलेला सव्वा वर्षाचा कालावधी संपल्याने माजी मंत्री शिंगणे यांची ग्वाही.
बुलडाणा : राजकीय तडजोडीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आला होता, तो संपल्यामुळे २६ जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक घेऊन या पदाधिकार्यांना सूचना दिली. त्यानुसार संबंधित पदाधिकारी राजीनामा देतीलच व संघटनेचा आदेश मान्य करतील, अशी ग्वाही माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद तसेच दोन समित्यांची सभापतिपदे आहेत. सव्वा वर्षाचा कालावधी झाल्याने या पदांवरील व्यक्तींना राजीनामे देण्याचे सूचविले आहे. पदाधिकार्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती डॉ. शिंगणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेत खांदेपालट निश्चित मानला जात आहे. पक्षाचे सदस्य असताना बुलडाणा पालिकेचे नगरसेवक रमेश गायकवाड यांनी दुसर्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी यांनी दिली.