२२ लाख आयटी प्रोफेशनल नोकऱ्या सोडणार; भारतात इंडस्ट्रीला घरघर, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 04:50 PM2022-10-04T16:50:37+5:302022-10-04T16:51:14+5:30

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

22 lakh IT professionals to leave jobs in India, what is the reason? | २२ लाख आयटी प्रोफेशनल नोकऱ्या सोडणार; भारतात इंडस्ट्रीला घरघर, कारण काय?

२२ लाख आयटी प्रोफेशनल नोकऱ्या सोडणार; भारतात इंडस्ट्रीला घरघर, कारण काय?

Next

आयटी क्षेत्रामुळे गेल्या दोन दशकांत भारताला सोन्याचे दिवस आले आहेत. आयटी सेक्टर वाढल्याने करोडो लोकांना रोजगार मिळाला आहे. घरांची मागणी, वाहनांची मागणी, जीवनावश्यक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, याच आयटी सेक्टरला आता घरघर लागण्याची चिन्हे आहेत. आयटी प्रोफेशनल्सची संख्या घटू लागल्याने बड्या बड्या आयटी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत. 

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा वेग कमालीचा वाढू लागला आहे. असेच सुरु राहिले तर २०२५ पर्यंत २२ लाख आयटी प्रोफेशनल नोकरी सोडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेला एट्रिशन रेट म्हटले जात आहे. स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दराची मोजमाप करण्यासाठी ही व्याख्या वापरली जाते. 

या रिपोर्टनुसार ५७ टक्के आयटी प्रोफेशनल पुन्हा कधीही आयटी सेक्टरमध्ये परतणार नाहीएत. पगार वाढल्याने चांगली कामगिरी करता येईल आणि समाधान मिळेल, असे या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. टीम लीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील यांच्यानुसार भारतीय आयटी क्षेत्राने गेल्या दशकात चांगली वाढ पाहिली आहे. IT क्षेत्राने 15.5 टक्के वाढ नोंदवली असून, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5.5 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम दोन्ही बदलले आहेत.
हे कर्मचारी आपल्या कामाचे स्वरुप आणि त्यांच्या करिअरचा आढावा घेत आहेत. यावर काही फरक दिसताच हे कर्मचारी आपली नोकरी अर्ध्यातच सोडून अन्य कामांकडे वळू लागले आहेत, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे आहे...
50 टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आयटी क्षेत्रातील कर्मचारी चांगले उत्पन्न आणि फायदे नसल्यामुळे नोकऱ्या सोडत आहेत. तर 25 टक्के लोकांचे म्हणणे आहे की करिअरमध्ये वाढ न होणे हे नोकऱ्या सोडण्याचे मुख्य कारण आहे. 2021 मध्ये नवीन-युगातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे, यामुळे देखील नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. 
 

Web Title: 22 lakh IT professionals to leave jobs in India, what is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.