वर्षभरात ६५ हजार पदांची होणार भरती; कौशल्य विकास विभाग करणार १९७ कंपन्यांसोबत एमओयू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:28 AM2023-08-16T10:28:12+5:302023-08-16T10:28:38+5:30

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात.

65 thousand posts will be recruited in a year skill development department will sign mou with 197 companies | वर्षभरात ६५ हजार पदांची होणार भरती; कौशल्य विकास विभाग करणार १९७ कंपन्यांसोबत एमओयू

वर्षभरात ६५ हजार पदांची होणार भरती; कौशल्य विकास विभाग करणार १९७ कंपन्यांसोबत एमओयू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात औरंगाबाद आणि नाशिक विभागातील उद्योगांना सुमारे ६५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने औरंगाबाद आणि नाशिक विभागातील १९७ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. याकरिता १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. या मेळाव्याला उपस्थित विविध उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात असतात. बऱ्याचदा त्यांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही, तसेच उमेदवारही मिळणाऱ्या वेतनावर खुश नसतात. परिणामी मेळाव्याला नुसतीच गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन उद्योगांना कुठल्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे, तसेच आगामी वर्षभरात त्यांच्या कंपन्यांमध्ये साधारणतः किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो, याबाबतची माहिती कौशल्य विकास विभागाने नुकतीच गोळा केली. त्यातून औरंगाबाद आणि नाशिक विभागामध्ये वर्षभरात सुमारे ६५ हजार रिक्त पदे असल्याचे समोर आले.

१८ ऑगस्ट रोजी इंडस्ट्रियल मीट 

१८ ऑगस्ट रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी दिली. ते म्हणाले की, या इंडस्ट्रियल मीटकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सचिव यांची उपस्थिती असेल. त्यांच्या उपस्थितीत उद्योजकांसोबत एमओयू करण्यात येईल.


 

Web Title: 65 thousand posts will be recruited in a year skill development department will sign mou with 197 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी