बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यानं वयाच्या ६४ व्या वर्षी MBBS होण्याचे स्वप्न केलं होतं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:29 PM2024-10-15T13:29:46+5:302024-10-15T13:30:08+5:30

ओडिशाचे रहिवासी जय किशोर प्रधान हे एसबीआय बँकेमधून डेप्युटी मॅनेजर पदावरून निवृत्त झाले आहेत.

A retired bank employee had fulfilled his dream of becoming an MBBS at the age of 64 | बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यानं वयाच्या ६४ व्या वर्षी MBBS होण्याचे स्वप्न केलं होतं पूर्ण

बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यानं वयाच्या ६४ व्या वर्षी MBBS होण्याचे स्वप्न केलं होतं पूर्ण

भुवनेश्वर : करिअर सुरू केल्यानंतर शिक्षणाकडे परत येणे जवळजवळ अशक्य असल्याचं म्हटलं जातं. मात्र, शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचं ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकता. याचच एक उदाहरण समोर आहे. ते म्हणजे जय किशोर प्रधान. एसबीआय बँकेतून निवृत्त झालेले जय किशोर प्रधान यांनी २०२० मध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी नीट यूजी (NEET UG) परीक्षा यशस्वीपणे पास केली.

ओडिशाचे रहिवासी जय किशोर प्रधान हे एसबीआय बँकेमधून डेप्युटी मॅनेजर पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतरही जय किशोर प्रधान यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची दीर्घकाळची आकांक्षा जिवंत ठेवली होती. अखेर नवीन हेतूने, कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत आपल्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू केला. जय किशोर प्रधान यांनी नीट तयारीसाठी पद्धतशीर दृष्टीकोन स्वीकारला आणि ऑनलाइन कोचिंगमध्ये अॅडमिशन घेतले. यानंतर जय किशोर प्रधान यांनी कठोर परिश्रम आणि तयारी सुरू ठेवली आणि त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहे.

आव्हानांवर मात
कौटुंबिक जीवनातील दडपणांसह स्पर्धा परीक्षांचा जास्त अभ्यास करणं, यासारखे अडथळे असतानाही जय किशोर प्रधान यांनी चिकाटी ठेवली. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या त्यांच्या ध्येयावर अटळ लक्ष केंद्रित केल्यानं त्यांना प्रेरणा मिळाली. वय हा फक्त एक आकडा आहे आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्याची पर्वा न करता स्वप्ने साध्य करता येतात, या विश्वासाचे उदाहरण जय किशोर प्रधान यांचा प्रवास दाखवतो. २०२० मध्ये, जेव्हा जय किशोर प्रधान यांनी नीट परीक्षा यशस्वीपणे पास केली, तेव्हा त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. या यशामुळं त्यांना वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (VIMSAR) मध्ये प्रतिष्ठित जागा मिळाली, जो त्यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

जय किशोर यांनी १९७४ मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षाही दिली होती
जय किशोर प्रधान यांनीही शालेय शिक्षणानंतर १९७४ मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली होती. मात्र, त्यावेळी परिक्षेत त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्रात बीएएसी केले. त्यानंतर शाळेत शिक्षक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी इंडियन बँकेत आणि एसबीआयमध्ये नोकरी केली. दरम्यान, डॉक्टर झाल्यानंतर गरिबांसाठी काम करू, असे जय किशोर प्रधान यांनी सांगितले होते.

वयोमर्यादा नाही
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, १०१९ च्या कलम १४ मध्ये असे नमूद केले आहे की, नीट (यूजी) घेणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही. हे धोरण सर्व वयोगटातील महत्वाकांक्षी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करते, जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण आणि करिअरच्या आकांक्षा फुलू शकतात या कल्पनेला बळकटी देते.

Web Title: A retired bank employee had fulfilled his dream of becoming an MBBS at the age of 64

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.