TATA मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून होणार उमेदवारांची निवड, किती मिळेल पगार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:44 PM2022-05-02T19:44:17+5:302022-05-02T19:44:57+5:30

या पदांसाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

actrec recruitment 2022 various job post vacant in tata memorial center walk in interview | TATA मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून होणार उमेदवारांची निवड, किती मिळेल पगार?

TATA मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! थेट मुलाखतीतून होणार उमेदवारांची निवड, किती मिळेल पगार?

googlenewsNext

मुंबई: आताच्या घडीला टाटा समूह अनेकविध क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक ठिकाणी टाटा समूह आपली सेवाही देत आहे. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे टाटा मेमोरियल सेंटर. टाटा मेमोरियल सेंटरच्या अँडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

या भरती प्रक्रियेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

रिसर्च असिस्टंट- टेक्निकलची पदे

टाटा मेमोरियल अंतर्गत रिसर्च असिस्टंट- टेक्निकलची पदे भरली जाणार आहेत. यासाठी थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. रिसर्च असिस्टंट टेक्निकल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएमएलटी/एएमएलटी किंवा बारावीसोबत सीएमएलटीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. तसेच संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्यांना १६ हजार ते २४ हजारपर्यंत पगार दिला जाईल. १० मे २०२२ रोजी या पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.

याशिवाय, ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. तसेच संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार ३०० ते २५ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 
 

Web Title: actrec recruitment 2022 various job post vacant in tata memorial center walk in interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.