Adani: अदानींच्या या उद्योगासमोर हिंडेनबर्गही निष्प्रभ, कठीण काळातही केली बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:00 PM2023-03-07T15:00:25+5:302023-03-07T15:01:40+5:30
Adani: अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही.
गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी हे नाव राजकीय आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. मात्र यावेळा गतवर्षीप्रमाणे सर्वाधिक कमाईसाठी नाही तर सर्वाधिक संपत्ती गमावल्यामुळे आणि पंतप्रधान मोदींशी असलेल्या कथित मैत्रिपूर्ण संबंधांमुळे ते चर्चेत आहेत. अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. अदानी समुहाची मार्केट कॅप १२ लाख कोटी रुपयांहून अधक घटली आहे. अदानी समुहातील जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर घसरले. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. ही कंपनी होती अदानी पोर्ट.
अदानी पोर्ट अदानी समुहातील सर्व कंपन्यांमध्ये कमाई करण्याच्याबाबतीत सर्वात पुढे राहिली आहे. दुसऱ्या शब्दात शब्दात सांगायचं तर ९० च्या दशकामध्ये आदानी समुहाच्या उद्योग साम्राज्याला विस्तार देण्याचं श्रेय अदानी पोर्टलाच जातं. सध्या अडचणीतून जात असलेले अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी हे या उद्योग समुहातील पहिल्या पिढीचे उद्योगपती आहेत.
यावेळी इदानी समुहाचं मुंद्रा पोर्ट हे बंदर भारतातील सर्वात मोठं खासगी क्षेत्रातील बंदर आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओदिशा यासारख्या सात राज्यांमध्ये १३ देशांतर्गत बंदरांमध्ये अदानी पोर्टची उपस्थिती आहे. मुंद्रा पोर्टमधून वर्षाला सुमारे १० कोटी मालाची ने आण होते. मुंद्रा पोर्ट देशातील सर्वात मोठं बंदर आहे. तसेच हे बंदर स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत तयार झालेलं आहे. त्यामुळे या बंदराच्या प्रमोटर कंपनीला कुठलाही कर द्यावा लागत नाही.
देशातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड लॉजिस्टिक कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा नफा चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरच्या तिमाहीमध्ये १३१५ कोटी रुपये एवढा होता. तो गेल्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत १३ टक्के कमी आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी पोर्ट्सचे शेअरही मोठ्या प्रमाणावर कोसळले होते. मात्र त्यामधील घटीचा दर हा इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक होता. एकंदरीत शेअर ३० टक्क्यांपर्यंत कोसळले होते. तसेच आता त्यामध्ये वाढ दिसून येत आहे.