अॅडमिशन घेताय? कॉलेज टूर घेतली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:57 PM2017-09-23T12:57:45+5:302017-09-23T12:57:53+5:30
नंबर लागला म्हणून घेतली अॅडमिशन असं करण्याचा जमाना गेला.
पूर्वी कसं कॉलेजला अॅडमिशन घेतली आणि मुकाट शिकायचं, चिडचिड करायची सुविधा नाहीत, मास्तर बरे नाहीत म्हणून पण चिकटून रहायचं त्याच कॉलेजात. आता मात्र तसं करता कामा नये, ज्या कॉलेजात अॅडमिशन घ्यायची त्या कॅम्पसची एक टूर करा. खात्री करा की इथं आपल्याला चांगलंच शिक्षण मिळेल आणि मगच अॅडमिशन घ्या. ती टुर घेता येते का, अर्थात येते, त्यासाठी या काही गोष्टी नक्की करून पहा.
1) ज्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायची त्या कॉलेजची आधी सगळी ऑनलाइन माहिती घ्या. हल्ली प्रत्येक कॉलेजची वेबसाईट असतेच. ती पहा. त्यानं त्या कॉलेजच्या वातावरणाचा एक अंदाज येईल.
2) अनेक कॉलेज हल्ली कॅम्पस टुर स्वतर्हून देतात. तसा उल्लेख त्यांच्या साईटवर असतो. तो नसेल तर आम्हाला एक टूर द्या, माहिती द्या अशी मागणी आपण कॉलेजकडे करूच शकतो. ती करा.
3) जमल्यास एखाद्या लेरला बसा. प्रोफेसरांना तशी विनंती केली तर नाही म्हणण्याची शक्यता फारशी नसते.
4) प्रयोगशाळा, अभ्यासिका, कम्प्युटर लॅब, ग्रंथालय पहा. तिथं जाऊन माहिती घ्या.
5) प्रोफेसर, विद्याथ्र्याना भेटा. आपल्या विषयांत कॉलेजात काय सोयी आहेत, काय नाहीत याची माहिती घ्या.
6) कट्टे पहा. तिथं काय चर्चा रंगतेय ते पहा. आपल्या अभ्यासक्रमाविषयी मुलांशी चर्चा करा.
7) फीचे स्वरुप समजून घ्या. प्रवेश रद्द केलाच तर किती फी परत मिळेल याची माहिती घ्या.
8) अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना किती आणि कुठं रोजगार मिळाले याची माहिती घ्या.