अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 02:49 PM2023-02-23T14:49:27+5:302023-02-23T14:49:35+5:30

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही.

agniveer 2023 apply fees half to be paid by indian army join | अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. अग्निवीर भरती दरम्यान भरल्या जाणार्‍या अर्जाच्या शुल्कापैकी अर्धी रक्कम भारतीय सैन्य उचलेल. आता अर्जाची निम्मी फी लष्कराकडून भरावी लागणार असून निम्मी फी उमेदवाराला भरावी लागणार आहे. भारतीय लष्करातील भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागत आहेत.

'जे तरुण दहावी उत्तीर्ण आहेत आणि पॉलिटेक्निक किंवा आयटीआय करत आहेत ते देखील अग्निवीरसाठी अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती 2023 च्या प्रक्रियेत बदल केले जात आहेत,  अशी भारतीय लष्कराने घोषणा केली होती.

रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!

याअंतर्गत आता उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षेत भाग घ्यावा लागणार असून त्यानंतर शारीरिक चाचणी अगोदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. "पूर्वी भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा होत होती, पण आता पहिली गोष्ट म्हणजे भरती झालेले लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. शारीरिक आणि वैद्यकीय तपासणीसारख्या इतर चाचण्या केल्या जातील, असंही कर्नल जी. सुरेश म्हणाले. 

कर्नल सुरेश यांनी अग्निवीर भरती प्रक्रियेतील आणखी एका मोठ्या बदलाबद्दलही सांगितले. 'अग्निवीर म्हणून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यासाठी त्यांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागतील, असंही ते म्हणाले, "या रकमेपैकी २५० रुपये भारतीय लष्कर उचलणार आहे, तर उमेदवाराला फक्त २५० रुपये भरावे लागतील." अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्षातून एकदाच नोंदणी करण्याची परवानगी आहे.

अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आधी लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे. अग्निवीर भरती तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यानंतर संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये उमेदवाराला हजर राहावे लागेल.

ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भर्ती कार्यालयांनी ठरवलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल. येथे पोहोचल्यावर त्याची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी करून त्याचे शारीरिक मोजमाप केले जाईल. तिसऱ्या टप्प्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

Web Title: agniveer 2023 apply fees half to be paid by indian army join

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.