प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:58 PM2023-07-04T14:58:58+5:302023-07-04T14:59:40+5:30

Agniveer Bharti 2023: प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे लष्कर तरुणांना बाहेर काढत आहे. 

agniveer bharti 2023 : candidates being thrown out due to injury during training army is considering changing the rules | प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते?

प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते?

googlenewsNext

गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निवीर अंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यासाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. यावर्षीही या योजनेंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये अग्निवीरची भरती होणार आहे. दुसरीकडे, अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात अग्निवीरसाठी निवड झालेले तरुण प्रशिक्षणादरम्यानच बाहेर पडत आहेत. दरम्यान, प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे लष्कर तरुणांना बाहेर काढत आहे. 

अग्निवीर भरतीमध्ये असा नियम आहे की, 6 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान कोणताही उमेदवार सलग 30 दिवस रजेवर राहिला तर त्याला बाहेर काढले जाईल, म्हणजे त्याला भरती केले जाणार नाही.  NBT च्या रिपोर्टनुसार, बिहारचा रहिवासी रितेश कुमार तीन वर्षांच्या मेहनतीनंतर सैन्यात अग्निवीरसाठी निवडला गेला. आर्टिलरी सेंटरमध्येही प्रशिक्षण सुरू झाले, पण दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले.रजेवरून परत आल्यानंतर रितेशने आणखी 7 आठवडे प्रशिक्षण घेतले, पण काही दिवसांपूर्वी त्याला रिलीव्हिंग लेटर देण्यात आले. 

हिमाचल प्रदेशातील रहिवासी मोहन सिंग याच्याबाबतही असेच घडले, प्रशिक्षणादरम्यान खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आणि कसम परेडच्या दोन दिवस आधी मोहन सिंगला सैन्यातून बाहेर काढण्यात आले. आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणादरम्यान असे प्रकार घडल्याने 15 हून अधिक तरुण बाहेर पडले आहेत.रिपोर्ट्सनुसार, लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक प्रशिक्षण केंद्रातून अशी प्रकरणे समोर येत आहेत. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कर नियम बदलण्याचा विचार करत आहे. 

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा विचार केला जात आहे, मात्र लगेच काही होऊ शकत नाही. सैन्याच्या नियमित भरतीमध्ये प्रशिक्षणादरम्यान कोणी जखमी झाल्यास त्याला पुन्हा एक बॅच मागे करणे, असा नियम होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात येत होती. नियमित भरतीमध्ये 9 ते 11 महिन्यांचे प्रशिक्षण असायचे, परंतु अग्निवीर भरतीमध्ये असा नियम नाही. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तरुण बाहेर केले जात आहे.

Web Title: agniveer bharti 2023 : candidates being thrown out due to injury during training army is considering changing the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.