Air India Recruitment 2022: टाटांच्या एअर इंडियात नोकरीची सुवर्ण संधी! ६५८ पदांसाठी भरती सुरू; ७५ हजारांपर्यंत पगार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 11:24 PM2022-04-16T23:24:06+5:302022-04-16T23:25:04+5:30

Air India Recruitment 2022: टाटा समूहात घरवापसी झालेल्या एअर इंडियात शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स...

aiasl recruitment 2022 air india job vacancy for 658 post for lucknow and kolkata international airport know all details | Air India Recruitment 2022: टाटांच्या एअर इंडियात नोकरीची सुवर्ण संधी! ६५८ पदांसाठी भरती सुरू; ७५ हजारांपर्यंत पगार 

Air India Recruitment 2022: टाटांच्या एअर इंडियात नोकरीची सुवर्ण संधी! ६५८ पदांसाठी भरती सुरू; ७५ हजारांपर्यंत पगार 

googlenewsNext

नवी दिल्ली: TATA ने Air India चे अधिग्रहण केल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत. कर्मचाऱ्यांनाही नियमितपणे वेतन तसेच वेतनवाढ देणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता टाटांच्याएअर इंडियामध्ये ६५८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विना परीक्षा ही भरती केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता आणि पदांविषयी जाणून घेऊया... (Air India AIASL Recruitment 2022)

एअर इंडियामध्येनोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एअर इंडियाने एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (AIASL) अंतर्गत अप्रेंटिस/हँडीवुमन, ग्राहक एजंट, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्व्हिस एजंट, कनिष्ठ कार्यकारी-तांत्रिक, ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-PACS या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६५८ पदे भरली जाणार आहेत. 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय?

ही भरती पूर्व विभागातील कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उत्तर विभागातील लखनऊ आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आहे. कोलकाता विमानतळासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२२ असून, लखनऊ विमानतळासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२२ आहे.

कोलकाता विमानतळ रिक्त जागा

- टर्मिनल मॅनेजर - १ 

- उप. टर्मिनल मॅनेजर-PAX - १  

- ड्युटी मॅनेजर-टर्मिनल - ६ 

- कनिष्ठ कार्यकारी-तांत्रिक - ५

- रॅम्प सर्व्हिस एजंट - १२

- युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर - ९६

- ग्राहक एजंट - २०६

- अन्य - २७७

यातील पदांसाठी ७५ हजारांपर्यंत पगार मिळू शकेल, असे सांगितले गेले आहे. 

लखनऊ विमानतळ रिक्त जागा

- ग्राहक एजंट - १३

- रॅम्प सर्व्हिस एजंट / युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर - १५

- अप्रेंटिस - २५

- कनिष्ठ कार्यकारी तांत्रिक - १

या सर्व पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी. टर्मिनल व्यवस्थापक, उप. टर्मिनल मॅनेजर-पॅक्स आणि ड्युटी मॅनेजर-टर्मिनल या पदांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे. तर अन्य सर्व पदांसाठी जनरलसाठी वयोमर्यादा २८ वर्षे, ओबीसींसाठी ३१ वर्षे, तर SC/ST साठी ३३ वर्षे वयोमर्यादा आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना रु. ५०० भरावे लागतील. सदर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती घेण्यासाठी या http://www.aiasl.in/Recruitment वेबसाइटला भेट द्यावी.
 

Web Title: aiasl recruitment 2022 air india job vacancy for 658 post for lucknow and kolkata international airport know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.