Air India: नोकरीची उत्तम संधी! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती; ५० हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:21 PM2021-05-21T19:21:22+5:302021-05-21T19:22:17+5:30

air india aiatsl recruitment 2021: केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे.

air india aiatsl recruitment 2021 vacancies for assistant officer and manager posts across india | Air India: नोकरीची उत्तम संधी! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती; ५० हजारांपर्यंत पगार

Air India: नोकरीची उत्तम संधी! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती; ५० हजारांपर्यंत पगार

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे ठप्प झालेले अनेक उद्योग, क्षेत्र हळूहळू सावरताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे. अकाऊंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (air india aiatsl recruitment 2021 vacancies for assistant officer and manager posts across india)

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातामध्ये पोस्टिंग मिळेल. पगारही आकर्षक असेल, असे सांगितले जात आहे. 

अर्ज करण्यासाठी पात्रता 

सामान्य ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे.

गुड न्यूज! टेक सेक्टरमध्ये ‘ही’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या; संकटात दिलासा

पदांची माहिती आणि पगार

मॅनेजर (फायनान्स) ४ पदे, ऑफिसर (अकाउंट्स) ७ पदे, असिस्टंट (अकाउंट्स) ४ पदे अशा एकूण १५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मॅनजेर पदासाठी ५० हजार रुपयांपर्यंत मासिक पगार, ऑफिसर पदासाठी ३२ हजार २०० रुपयांपर्यंत मासिक पगार, असिस्टंट पदासाठी २१ हजार ३०० रुपयांपर्यंत मासिक पगार मिळू शकेल.

कसा कराल अर्ज?

एयर इंडियाच्या या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमच्याद्वारे जमा केलेले अर्ज स्क्रीनिंग करून आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकमधून डाऊनलोड करा. प्रिंटआऊट काढा. ते भरून सॉफ्टकॉपी एअर इंडियाच्या ईमेल आयडी hrhq.aiasl@airindia.in वर पाठवा. ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे अटॅच करा. अर्जांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम मुदत १ जून २०२१ आहे.
 

Web Title: air india aiatsl recruitment 2021 vacancies for assistant officer and manager posts across india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.