JOB Alert : गुड न्यूज! एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती; मिळणार 1 लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:29 AM2021-08-12T11:29:35+5:302021-09-25T15:20:53+5:30
AAI Recruitment 2021 : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (AAI Recruitment 2021) विविध पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सीनियर असिस्टंट या पदासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.
पात्र विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्यापूर्वी भरती प्रक्रियेचं नोटीफिकेशन वाचून घ्यावे, असे आवाहन देखील एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं केले आहे. एकूण 29 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून अर्ज दाखल करण्यास उशीर न करता पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 29 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021
JOB Alert : खूशखबर! 34,000 रुपये पगार मिळणार; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#JobAlert#bank#IDBIBankRecruitment2021https://t.co/WNsaYbUz6V
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021
जागा
सीनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) - 14 जागा
सीनियर असिस्टंट (वित्त) - 6 जागा
सीनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) - 9 जागा
पात्रता
- सीनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासोबतच त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे.
- सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
- सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग मधील उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
तिन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
पगार
सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
सीनियर असिस्टंट वित्त : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कधी करायचा अर्ज?#job#JobAlert#India#Engineerhttps://t.co/JRdKlUba0U
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021