Amazon च्या माध्यमातून महिन्याला कमवू शकता ६० हजार; फक्त करावं लागणार प्रतिदिन ४ तास काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 01:08 PM2021-07-19T13:08:57+5:302021-07-19T13:10:24+5:30
खरंतर Amazon India भारतात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. त्यासाठी अत्यंत गरजेचे प्रोडक्ट डिलिवरीची वेळ कमी करण्यावर अमेझॉनने भर दिला आहे.
ई कॉमर्सची दिग्गज कंपनी अमेझॉन इंडिया(Amazon India) लोकांना पैसे कमविण्याची चांगली संधी देत आहे. जर तुम्हीही अशा नोकरीच्या शोधात असाल ज्यात वेळेचे कोणतंही बंधन नको, तर तुमच्यासाठीही सर्वात चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करून प्रत्येक महिन्याला ५५ ते ६० हजार रुपये कमवू शकता. ते कसं हे जाणून घेऊया.
खरंतर Amazon India भारतात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. त्यासाठी अत्यंत गरजेचे प्रोडक्ट डिलिवरीची वेळ कमी करण्यावर अमेझॉनने भर दिला आहे. त्याचमुळे आज कंपनी देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये डिलिवरी बॉयच्या शोधात आहे. यात ग्राहकांना पॅकेज गोदाऊनमधून घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहचवणं हे काम आहे. जर तुम्ही हे काम करू इच्छिता तर जवळच्या Amazon India च्या गोदाऊनशी संपर्क साधा.
१०-१५ किमी परिसरात द्यावी लागेल सुविधा
कंपनीच्या माहितीनुसार, एका डिलिवरी बॉयला दिवसाला १०० ते १५० पॅकेज द्यावे लागतील. ही सर्व पॅकेज गोदाऊनपासून १० ते १५ किमी परिसरातील असतील. त्यासाठी तुम्हाला दिवसाला ४ ते ५ तास काम करावं लागेल. त्यानंतर तुम्ही दुसरंही काम करू शकता. विशेष म्हणजे या प्रोडक्टचं डिलिवरी टाईम सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत असेल. यातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेळेची निवड करू शकता.
कसं कराल एप्लाय?
जर तुम्ही या पदासाठी अर्ज देऊ इच्छित असाल तर त्यासाठी https://logics.amazon.in/applynow या लिंकवर क्लिक करावं लागेल. डिलिवरी बॉय पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे डिग्री असावी लागेल. तुमच्या शाळेचं अथवा कॉलेजचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. डिलिवरीसाठी अर्ज करणाऱ्यांकडे स्वत:ची बाईक अथवा स्कूटर असावी. बाईक किंवा स्कूटरचा विमा, आरसी बंधनकारक आहे. त्याचसोबत अर्जदाराकडे वाहन चालक परवाना असणं गरजेचा आहे.
प्रत्येक महिन्याला कमवू शकता ६० हजार
डिलिवरी बॉयला दर महिन्याला वेतन दिलं जाईल. Amazon India च्या डिलिवरी बॉयला १२ हजार ते १५ हजारापर्यंत फिक्स सॅलरी दिली जाते. पेट्रोल तुमच्या पैशाचे असेल. जर तुम्ही प्रॉडक्ट डिलिवरीच्या तुलनेत पैसे घेणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, पॅकेज दिल्यानंतर तुम्हाला १० ते १५ रुपये मिळतात. डिलिवरी सर्व्हिस प्रोवाडर नुसार तुम्ही महिनाभर काम करतात आणि दिवसाला १५० पॅकेज डिलिवर करत असाल तर तुम्हाला सहजपणे ५५ हजार ते ६० हजार महिन्याला कमवता येतील.