Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्समध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथे भरा फॉर्म 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:02 PM2022-12-27T13:02:20+5:302022-12-27T13:03:42+5:30

Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्सने एक अधिसूचना जारी करून रायफलमन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

assam rifles recruitment 2023 notification for rifleman post application form bharti rally dates here | Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्समध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथे भरा फॉर्म 

Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्समध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथे भरा फॉर्म 

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. आसाम रायफल्समध्ये ही भरती होत आहे. अशा परिस्थितीत, किती जागा रिक्त आहेत आणि कोण अर्ज करू शकेल, याची सर्व माहिती तुम्ही येथे तपासू शकता.

आसाम रायफल्सने एक अधिसूचना जारी करून रायफलमन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याद्वारे एकूण 95 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये रायफल मॅनच्या 81, हवालदार लिपिकाच्या 1, वॉरंट ऑफिसरच्या 2, रायफलमन आर्मरच्या 1 आणि इतर रायफल मॅनच्या 10 पदांचा समावेश आहे.

अर्ज कोठे करावा?
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा-
Directorate General Assam Rifles (Recruitment Branch) Laitkor, Shillong Meghalaya – 793010

लक्षात असू दे की, अर्ज 22 जानेवारी 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. तसेच,  11 फेब्रुवारी रोजी भरतीसाठी मेळावा आयोजित केला जाईल.

आसाम रायफल्स भरतीसाठी उमेदवाराची पात्रता
रायफलमन जनरल ड्युटी – 10वी पास
हवालदार लिपिक – टायपिंग स्पीडसह 12वी पास
रेडिओ मेकॅनिक - रेडिओ आणि टेलिव्हिजन डिप्लोमासह 10 वी उत्तीर्ण
ड्राफ्ट्समन – 12वी पास
रायफलमॅन वॉशरमन – 10वी पास
सुतार, स्वयंपाकी, सफाई कामगार – 10वी पास

उमेदवारांची वयोमर्यादा
आसाम रायफल्सच्या पदांसाठी विहित वयोमर्यादा 18-23 वर्षे आहे. मात्र काही पदांसाठी ते 18 ते 25 वर्षे आहे.

Web Title: assam rifles recruitment 2023 notification for rifleman post application form bharti rally dates here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.