बँकेत नोकरी करण्याची संधी, पीओसह विविध पदांवर भरती, आजच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 03:58 PM2023-06-01T15:58:58+5:302023-06-01T15:59:37+5:30
IBPS RRB Notification 2023: उमेदवार IBPS ऑनलाइन ibps.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) विविध सरकारी बँकांमध्ये लिपिक पीओसह अनेक पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज 1 जून 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवार IBPS ऑनलाइन ibps.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
दरम्यान, उमेदवार 21 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/PO (असिस्टंट मॅनेजर) , ऑफिसर स्केल 2 (व्यवस्थापक) आणि ऑफिस स्केल 3 (वरिष्ठ मॅनेजर) या पदांसाठी एकूण 8612 पदांची भरती करायची आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या विविध ग्रामीण बँकांमध्ये जातील.
'या' पदांवर केली जाणार भरती
ऑफिस असिस्टंट – 5538 पदे
अधिकारी स्केल I – 2485 पदे
ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) – 60 पदे
ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) – 3 पदे
ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) – 8 पदे
ऑफिसर स्केल II (कायदा) – 24 पदे
ऑफिसर स्केल II (CA) – 18 पदे
ऑफिसर स्केल II (IT) – 68 पदे
ऑफिसर स्केल II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 पदे
अधिकारी स्केल III – 73 पदे
कोण करू शकतं अर्ज?
या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. वयोमर्यादाही वेगळी ठरवण्यात आली आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहितीसाठी उमेदवार जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात.
चार टप्प्यात होईल नियुक्ती...
या सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल.
अशा प्रकारे करा अर्ज...
- IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
- होम पेजवर दिलेल्या संबंधित पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
- मेल आयडी इत्यादी आवश्यक डिटेल्स प्रविष्ट करून रजिस्ट्रेशन करा.
- आता अर्ज प्रक्रिया सुरू करा आणि डाक्युमेंट्स अपलोड करा.
- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.