JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत भरती, आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:47 AM2021-08-19T08:47:58+5:302021-08-19T08:51:15+5:30

Bank of India Recruitment 2021 : अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

bank of india has invited applications to fill 21 vacancies for support staff how to apply | JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत भरती, आजच करा अर्ज

JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत भरती, आजच करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली - बँकेतनोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India Recruitment 2021) सहाय्यक कर्मचारी पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. नोटीफिकेशननुसार एकूण 21 पदांची भरती केली जाईल. इच्छूक उमेदवार 31 ऑगस्ट 2021 पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. 

बँक ऑफ इंडियाने (BOI) जारी केलेल्या या रिक्त जागेअंतर्गत मैनपुरी, कन्नौज आणि फर्रुखाबाद येथे उमेदवारांची निवड केली जाईल. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. अर्जाची तारीख संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता आणि पगार याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in वर जा. 

पात्रता 

- पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BSW/ BA/ B.Com मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. यासह, संगणकाचे ज्ञान तेथे असले पाहिजे. 

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असावे. 

अशी होईल निवड

- उमेदवारांची लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि प्रेझेंटेशनच्या आधारावर सपोर्ट स्टाफच्या पदांसाठी निवड केली जाईल. 

- लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेशी संबंधित प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर मुलाखतीत उमेदवारांकडून नेतृत्व, संवाद कौशल्य, समस्या सोडवणे यासह इतर प्रश्न विचारले जातील. 

अर्ज कसा करावा?

- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट - bankofindia.co.in वर जा. वेबसाईटच्या होम पेजवर, करिअर विभागात जा. येथे दिलेल्या सूचनांनुसार, फॉर्म डाऊनलोड करा. अर्ज भरा आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवा. 

- झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, आग्रा झोनल ऑफिस, पहिला मजला एलआयसी बिल्डिंग, संजय पॅलेस, आग्रा -282002. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे, त्यानंतर फॉर्म स्वीकारला जाणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Read in English

Web Title: bank of india has invited applications to fill 21 vacancies for support staff how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.