Bank of India Recruitment 2021: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ३० जूनपर्यंत करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:09 PM2021-06-21T15:09:05+5:302021-06-21T15:10:14+5:30
Bank of India Recruitment 2021: बँक ऑफ इंडियानं (Bank Of India) बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोकर भरतीची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Bank of India Recruitment 2021: बँक ऑफ इंडियानं (Bank Of India) बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोकर भरतीची माहिती प्रसिद्ध केली आहे. बँकेत कंत्राटी पद्धतीवर ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि सुरक्षारक्षकासह इतर पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुकांना ३० जून २०२१ पर्यंत नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. नोकरीसाठीची उमेदवाराची पात्रता आणि इतर माहिती देखील बँकेनं पत्रक काढून जाहीर केली आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाणार आहे.
बँक ऑफ इंडियाच्याbankofindia.co.in या संकेतस्थळावर नोकर भरती संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. बँकेच्या ऑफिस असिस्टंटसाठी १५ हजार रुपये दरमहा वेतन, अटेंडरसाठी ८ रुपये दरमहा वेतन आणि सुरक्षारक्षकासह माळ्यासाठी दरमहा ५ हजार रुपये वेतन मिळणार आहे. यात प्रत्येक पदासाठीची पात्रता वेगवेगळी आहे. शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादेची सविस्तर माहिती बँकेनं नोटिफिकेशनमध्ये जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीनं देखील आपला अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी बँकेच्या नोटफिकेशनसोबत एक फॉर्म दिला जाईल तो भरावा लागणार आहे. त्यानंतर फॉर्म पोस्टाच्या माध्यमातून बँकेला पाठवावा लागणार आहे.
मासिक वेतन किती मिळणार? (Bank of India Recruitment 2021: Salary)
- ऑफिस असिस्टंट: दरमहा १५ हजार रुपये
- अटेंडर: दरमहा ८ हजार रुपये
- सुरक्षारक्षक आणि माळी: दरमहा ५ हजार रुपये
नोकरीसाठी शैक्षणिक अट काय? (Bank of India Recruitment 2021: Educational Qualification)
- ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला अकाऊंटिंगचं मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. यासोबतच उमेदवाराला एमएस ऑफिस (वर्ड आणि एक्सेल), टॅली आणि इंटरनेटचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. इंग्रजी आणि मातृभाषेतील टायपिंग येणं अधिक चांगलं ठरेल.
- अटेंडर पदासाठी संबंधित जिल्ह्यातच वास्तव्याला असलेल्या उमेदवाराला पसंती दिली जाईल.
- सुरक्षारक्षक आणि माळी पदासाठी देखील संबंधित जिल्ह्यातीलच उमेदवाराला पसंती दिली जाईल.
वयोमर्यादेची अट (Bank of India Recruitment 2021: Age Limit)
- ऑफिस असिस्टंट- १८ ते ४५ वर्ष
- अटेंडर- १८ ते ६४ वर्ष
- सुरक्षारक्षक आणि माळी- १८ ते ६५ वर्ष