'या' बँकेत विशेष अधिकारी पदांसाठी बंपर भरती, पदवीधर करू शकतात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:09 AM2023-01-24T09:09:41+5:302023-01-24T09:11:30+5:30
bank job : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : बँक ऑफ महाराष्ट्रने विशेष अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 225 पदांची भरती केली जाईल. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी BoM Recruitment साठीची अधिकृच बेवसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी. ज्या इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विशेष अधिकारी पदाच्या 2023 साठी अर्ज करायचा आहे, ते 23 जानेवारी 2023 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत केले जातील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.
विशेष अधिकारी पदांसाठी अर्ज
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट दिली.
- वेबसाइटच्या होमपेजवर Career च्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर Recruitment of Specialist Officers in Scale II & III Project 2023-24 च्या लिंकवर क्लिक करा.
- पुढील पेजवरील Registration Link वर क्लिक करा.
- यानंतर मागितलेली सर्व माहिती रजिस्ट्रेशन करा
- रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
अर्जाची फी
यामध्ये अर्ज करण्यासाठी फी ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये जनरल कॅटगरी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना फी म्हणून 1180 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, इतर उमेदवारांसाठी 118 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
विशेष अधिकारी पदावर नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 35 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
एकूण 225 पदांची भरती
दरम्यान, या पदांसाठी ibps.in द्वारे सर्व निवड प्रक्रिया केली जात आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 225 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये जनरल कॅटगरीच्या 138 पदांवर भरती होणार आहे. तसेच, ओबीसीसाठी 47, ईडब्ल्यूएससाठी 14, एससीसाठी 21 आणि एसटीसाठी 5 पदांवर भरती केली जाईल.