नोकरीची सुवर्णसंधी; 'या' बँकेत 690 हून अधिक पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 01:01 PM2022-05-09T13:01:28+5:302022-05-09T13:23:43+5:30
Bank of India Jobs 2022 : उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत साईट bankofindia.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India) अनेक विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 10 मे पर्यंतच अर्ज करू शकतात. या पदांसाठी नियमित आणि कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत साईट bankofindia.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
रिक्त जागा
बँक ऑफ इंडियाद्वारे चालविण्यात येत असलेल्या या भरती मोहिमेद्वारे 696 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 594 पदांवर नियमित नियुक्ती करण्यात येणार असून 102 पदे कंत्राटी पद्धतीने रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
किती भरावे लागेल शुल्क?
या भरतीसाठी अर्ज करणार्या SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये ठेवण्यात आले आहे. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी हे शुल्क 850 रुपये आहे.
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
अशाप्रकारे करा अर्ज...
- उमेदवाराला सर्वात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in ला भेट द्यावी लागेल .
- त्यानंतर होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करावे लागेल.
- आता भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
- आता उमेदवाराला अर्ज टॅबवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर उमेदवार स्वतःची नोंदणी करून अर्जासोबत फी भरू शकतात.
- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.