JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! Bank of India मध्ये क्रेडिट मॅनेजरसह 696 जागांसाठी भरती; कसा, कुठे करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:15 IST2022-04-27T12:00:37+5:302022-04-27T12:15:31+5:30
Bank Of India Recruitment 2022 : बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! Bank of India मध्ये क्रेडिट मॅनेजरसह 696 जागांसाठी भरती; कसा, कुठे करायचा अर्ज?
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) ने अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या रिक्त पदांतर्गत, क्रेडिट मॅनेजर आणि रिस्क मॅनेजरसह 696 पदांची भरती केली जाईल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागतील. उमेदवार बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 निश्चित करण्यात आली आहे.
जागा
1. इकोनॉमिस्ट - 2
2. स्टॅटिक्स - 2
3. रिस्क मॅनेजर - 2
4. क्रेडिट एनालिस्ट - 53
5. क्रेडिट ऑफिसर - 484
6. टेक अप्रॅसल - 9
7. आयटी मॅनेजर - 21
8. सीनियर आयटी मॅनेजर - 23
अधिक पदांबद्दल जाणून घेण्यासाठी, उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली माहिती वाचू शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. परीक्षेदरम्यान, उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रश्न दिले जातील. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.