Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' 500 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:42 AM2022-02-22T10:42:57+5:302022-02-22T10:44:18+5:30
Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची आजची म्हणजेच 22 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे.
सरकारी बँकांमध्येनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची आजची म्हणजेच 22 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे स्केल 2 आणि स्केल 3 मध्ये जनरलिस्ट ऑफिसरच्या भरतीसाठी पुण्यातील मुख्यालय आणि देशभरातील शाखांद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया आज संपणार आहे. अशा परिस्थितीत, ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते बँकेच्या अधिकृत वेबसाइट, bankofmaharashtra.in वर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रियेअंतर्गत, इच्छुक उमेदवारांना आज 1180 रुपये विहित शुल्क देखील भरावे लागेल. उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल. दरम्यान, त्यानंतर उमेदवार 9 मार्चपर्यंत त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र अर्ज 2022 प्रिंट करू शकतील. तसेच, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
Generalist Officer (Scale-II) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
Generalist Officer (Scale-III): अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्यास सुरुवात : 5 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख : 12 मार्च 2022
निकालाची तारीख : अद्याप जाहीर नाही
अर्ज शुल्क :
सामान्य/ओबीसी प्रवर्ग : 1180 रुपये
आर्थिकदृष्ट्या मागास : 1180 रुपये
अनुसूचित जाती/ जमाती : 118 रुपये
महिला/दिव्यांग : निशुल्क
वयोमर्यादा :
किमान वय: 25 वर्षे
कमाल वय: 35 वर्षे (स्केल-II)
कमाल वय: 38 वर्षे (स्केल-III)