BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर; 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 01:27 PM2023-04-23T13:27:00+5:302023-04-23T13:27:44+5:30

BARC Stipendiary Trainee Recruitment : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना barc.gov.in या BARC Recruitmentच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

barc stipendiary trainee recruitment 2023 job for 10th 12th pass apply at barc gov in | BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर; 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर; 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी

googlenewsNext

सध्या मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यावेळी दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांना नोकऱ्या देण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भात 4300 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना barc.gov.in या BARC Recruitmentच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. BARC द्वारे जारी करण्यात आलेल्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 24 एप्रिल 2023 रोजी सुरू होईल. यामध्ये फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, ज्यासाठी 22 मे 2023 पर्यंत संधी असेल. मात्र, या रिक्त जागांसाठी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

भाभा अणुसंशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनीसह एकूण 4374 पदांवर भरती करण्यात येणार असून यामध्ये श्रेणी 1 मधील 1216 पदांवर आणि 2946 श्रेणी 2 मधील स्टायपेंडरी ट्रेनी पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर टेक्निकल ऑफिसर पदाच्या 181 जागांसाठी भरती होणार आहे. इतर अनेक पदांसाठी जागा ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचे डिटेल्स अधिसूचनेत पाहिले जाऊ शकतात.

या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी शुल्क जमा करणे फार महत्वाचे आहे. यामध्ये पदांनुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, टेक्निकल ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये जमा करावे लागतील. सायंटिफिक असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी शुल्क 150 रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय, तुम्ही प्रशिक्षणार्थीसाठी 100 रुपयांमध्ये अर्ज करू शकाल. एससी, एसटीसाठी मोफत अर्ज करण्याचा ऑप्शन आहे.

कोण करू शकतो अर्ज?
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी एक मध्ये अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेशी संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा करण्यास सांगितले आहे. त्याच श्रेणी दोनसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तर पदानुसार 12वी पासची पात्रताही ठेवण्यात आली आहे. तुम्ही अधिसूचनेत पात्रता आणि वयोमर्यादेचे डिटेल्स पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 एप्रिल 2023]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
 

Web Title: barc stipendiary trainee recruitment 2023 job for 10th 12th pass apply at barc gov in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी