ITI Jobs 2021: आयटीआय पास उमेदवारांसाठी निघाली भरती; बिना परीक्षा मिळणार सरकारी नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:40 PM2021-05-31T19:40:51+5:302021-05-31T19:42:20+5:30
ITI Jobs 2021 in Bharat Electronics Limited (BEL): जर तुम्ही 10 वी नंतर आयटीआय कोर्स केला असेल (ITI Course) तर तुम्हाला केंद्र सरकारी नोकरीची (Govt Jobs) संधी आहे.
BEL ITI Apprentice Vacancy 2021: जर तुम्ही 10 वी नंतर आयटीआय कोर्स केला असेल (ITI Course) तर तुम्हाला केंद्र सरकारी नोकरीची (Govt Jobs) संधी आहे. भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने आयटीआय अॅप्रेंटिस पदांसाठी (ITI Job vacancy) भरती काढली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. (BEL Recruitment 2021: Bharat Electronics Limited (BEL) has invited applications for recruitment to the post of Apprentice Training for ITI Candidates.)
या ट्रेडमध्ये होणार भरती...
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- फिटर
- इलेक्ट्रीशियन
- मशीनिस्ट
- टर्नर
- ड्राफ्ट्समन मॅकेनिक
- इलेक्ट्रो प्लेटर
- मॅकेनिक रेफ्रिजरेशन अँड एयर कंडीशनिंग
- कॉम्प्यूटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टेंट
- वेल़्डर
या पदांवर पे-स्केल प्रति महिना 10,333 रुपये असणार आहे. हे बेसिक पे आहे. याशिवाय अन्य अनेक भत्ते पगारासोबत दिले जाणार आहेत. कोणत्या ट्रेडसाठी किती जागा भरण्यात येत आहेत, याची माहिती सध्या देण्यात आलेली नाही.
या नोकरीसाठ उमेदवारांनी 10 नंतर संबंधीत ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे. एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटी (SCVT) मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय कोर्स उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑफलाईन करावा लागणार आहे. यासाठी पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंकवर जाऊन क्लिक करा. तिथे तुम्हाला अर्ज मिळणार आहे. तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकणार आहात. हा अर्ज भरताना 10 वी आणि आयटीआय मार्कशीट, सर्टिफिकेट आणि अन्य महत्वाची कागदपत्रांची स्वाक्षरी केलेली झेरॉक्स या पत्त्यावर पाठवायची आहे.
पत्ता- डेप्युप्टी मॅनेजर (HR/CLD), सेंटर ऑफ लर्निंग अँड डेवलपमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जालाहल्ली पोस्ट, बंगळुरू - 560013 (कर्नाटकमध्ये पाठवायचे असल्याने शक्यतो इंग्रजीत पत्ता लिहिल्यास सोईचे होईल.)
तुमचा अर्ज या पत्त्यावर 30 जून 2021 आधी पोहोच झाला पाहिजे. यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
निवड कशी होईल...
बीईएलच्या अॅप्रेंटिस पदांसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. तुम्ही मिळवलेल्या 10 वी आणि आयटीआयच्या गुणांवर निवड केली जाणार आहे.
BEL Apprentice job notification आणि application form साठी इथे क्लिक करा...
BEL च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...