BEL Recruitment 2022: जॉब अलर्ट! भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची संधी; 90 हजारांवर देणार पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 02:21 PM2022-04-10T14:21:10+5:302022-04-10T14:21:56+5:30
गेल्यावर्षी जे उमेदवार इंजिनिअर झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी ...
गेल्यावर्षी जे उमेदवार इंजिनिअर झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशिअन पदावर भरती सुरु केली आहे. या भरतीद्वारे ९१ पदे भरली जाणार आहेत.
इच्छुक उमेदवार bel-india.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकणार आहेत. इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशिअन या पदांसाठी ६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याची शेवटची तारीख 20 एप्रिल आहे. या भरती मोहिमेद्वारे प्रशिक्षणार्थीच्या 66 आणि तंत्रज्ञांच्या 25 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
उमेदवाराचे वय 1 मार्च 2022 रोजी 28 वर्षांपेक्षा कमी असावे. शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयाची अट शिथिल आहे. इतर मागासवर्गीयांना 3 वर्षांची आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शिक्षणाची अट...
असिस्टंट ट्रेनी - उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 60% गुणांसह 3 वर्षांची अभियांत्रिकी पदवी घेतलेली असावी.
टेक्निशिअन - उमेदवारांना SSLC + ITI + एक वर्षाची अप्रेंटिसशिप किंवा SSLC + 3 वर्षाचे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...