JOB Alert : खूशखबर! भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार तब्बल 2 लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 04:00 PM2021-08-29T16:00:00+5:302021-08-29T16:05:57+5:30
BHEL Recruitment 2021 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिममिटेडने देशभरातील विविध शहरातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
नवी दिल्ली - भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये (BHEL Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. भेलकडून वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. एकूण 27 पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट careers.bhel.in वर जाऊन अर्ज करावा.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिममिटेडने देशभरातील विवध शहरातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भोपाळ , हरिद्वार, हैदराबाद, झाशी, रानीपेट,जगदीशपूर, त्रिची आणि दिल्ली येथील जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.
असा करा अर्ज
- सर्वप्रथम भेलची वेबसाईट career.bhel.in वर जा.
- Recruitment of Medical Professionals याच्या लिंकवर क्लिक करा.
- अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करून अर्ज भरा.
- मागण्यात आलेले डॉक्यूमेंट आणि स्कॅन केलेला फोटो अपलोड करा.
- डॉक्यूमेंट अपलोड करुन परीक्षा फी भरा.
- अर्जाची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.
JOB Alert : नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#Job#JOBAlert#NuclearPowerCorporationhttps://t.co/YTgMMXc7vM
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2021
पात्रता
भेलकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 27 पदं भरली जाणार आहेत. अर्ज दाखल करणारा उमेदवार हा वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह एमबीबीएस पदवीधर असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे मेडिकल क्षेत्रात काम केल्याचा एका वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पात्र व इच्छूक उमेदवर भेलच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात.
वयोमर्यादा
भेलच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय 37 वर्षांपेक्षा अधिक असू नये.
JOB Alert : Intelligence Bureau मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; असा करा अर्ज#Job#JOBAlert#IntelligenceBureauRecruitment2021https://t.co/Gi11om6Ira
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021
पगार
वरिष्ठ चिकित्सा अधिकारी पदासाठी पगार 70 हजार ते 2 लाखांपर्यंत दिला जाणार आहे.
अर्जाचं शुल्क
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना 354 रुपये शुल्क जमा करावं लागणार आहे. याशिवाय जीएसटी देखील द्यावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?#Job#JOBAlert#IOCLRecruitment2021https://t.co/MspaCsYWFu
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021